राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा आघाडीच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर

नाशिक(प्रतिनिधी):-राजस्थान मधील जल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावातील दलीत मेघवाल समाजाच्या बालकाची जातीय द्वेषातुन हत्त्या केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने *राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मा.अण्णासाहेब कटारे यांच्या आदेशाने* नाशिक जिल्हाधिकारी पी.गंगाधरन यांना युवा नेतृत्व बिपीन अण्णासाहेब कटारे,नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाई बागुल,पंचवटी युवा अध्यक्ष हेमंत आहेर,नाशिकरोड प्रतीक सोनटक्के,सातपूर धर्मराज पाईकराव,प्रशांत शिंदे यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले,
भारतीय संविधानातील अनुच्छेद 17 नुसार कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता पाळण्यावर बंदी आहे. असे असताना देखील भारतीय गणराज्यातील घटक राज्य राजस्थान मधील जालोर जिल्ह्या, सुराणा गाव, येथील सरस्वती विद्या मंदिर स्कूल मधील इयत्ता तिसरीतील 9 वर्षीय विद्यार्थी “इंद्रकुमार मेघवाल” याची पिण्याच्या पाण्याच्या माठाला हात लावला म्हणून “छैल सिंह” या शिक्षकाने ‘एका अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्याने पिण्याच्या पाण्याला हात लावला म्हणून, जातिवाचक शिवीगाळ करून, क्रूर आणि अमानुष पद्धतीने 20 जुलै 2022 रोजी मारहाण केली, सदर विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आला, परंतु मृत्यू सोबत चाललेली त्याची झुंज अखेर संपली, अहमदाबाद मधील सिविल हॉस्पिटल मध्ये 13 ऑगस्ट रोजी इंद्रकुमार मेघवाल चा मृत्यू झाला, हा मृत्यू नसून हत्या आहे
*अशी भयानक परिस्थिती राजस्थान या राज्यांमध्ये अनुसूचित जाती व जनजाति समोर निर्माण झाली आहे. त्यामुळे जातीवादी शक्ती, संविधान विरोधी शक्ती, मानवता विरोधी शक्ती मोकाट फिरत असून त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही धाक राहिलेला नाही असे युवा नेतृत्व बिपीन कटारे यांनी बोलतांना सांगितले.*
अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील राजस्थानमधील सरकार अकार्यक्षम असून, संपूर्ण राजस्थान मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे
*त्यामुळे पीडिताच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून 2 करोड रुपये आणि परिवारा मधील एका सदस्याला सरकारी नोकरी तात्काळ देण्यात यावी अशी मागणी नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल यांनी केली आहे.*
गुन्हेगार छैल सिंहला फास्ट ट्रॅक कोर्ट द्वारा दोषी ठरवून फाशीची सजा सुनावण्यात यावी
अनुसूचित जाती आणि जनजाति विरोधी राजस्थान मधील अशोक गेहलोत सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी वरील निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक आणि न्यायिक दृष्टिकोनातून विचार करून इंद्रकुमार मेघवाल याला न्यायच द्यावा
_________________________