ताज्या घडामोडी

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,भिवंडी येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले.

*स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात स्वातंत्र्य दिनाचा विजय असो,भारत माता की जय ,वंदेमातरम, भारतीय लोकशाहीचा विजय असो,संविधानाचा विजय असो अशा घोषणा देत धुमधडाक्यात काढण्यात आली.

*गृपग्रामपंचायत डोहोळे सरपंच सुमन वाघे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचा जयघोष करण्यात आला. तसेच निपुण भारत अभियान अंतर्गत निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली.*

*ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव व मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले

*निपुण भारत अभियान अंतर्गत उपस्थित मातापालक गटातील गटप्रमुखांचे व सदस्य मातांचे गुलाब पुष्प देऊन दिलशाद शेख मॅडम यांनी स्वागत केले व मातापालक गटाची मिटिंग घेऊन त्याना योग्य मार्गदर्शन दिलशाद शेख मॅडम यांनी केले*

*बालसभेत विद्यार्थानी समुह नृत्य व भाषणे सादर केली.*

*ग्रामपंचायत डोहोळे,ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव, ग्रामपंचायत सदस्या नित्या निवृत्ती मगर, किसन चव्हाण यांनी विद्यार्थांना चाॅकलेट वाटप केले.

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी केले.** *सदर कार्यक्रमाला ग्रामस्थ, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, मातापालक, आजी माजी विद्यार्थी,बहुसंख्येने उपस्थित होते*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.