महाराष्ट्र

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका

राम पूर्णेकर यांच्या नेतृ्त्वात पूर्णेकर कुटुबीयांनी आज आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले.

ठाणे : मानपाडा येथील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep purnekar) यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. तसेच, अद्यापही याप्रकरणी माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीची चौकशी सुरू आहे. मात्र, राजेंद्र शिंदे ह्यांनीच हा कटर चला असून जोपर्यंत त्यांना अटक होत नाहीत, तोपर्यंत पोलीस स्टेशन न सोडण्याचा इशाराचा पूर्णेकर कुटुंबीयांनी दिला. दुसरीकडे मिनाक्षी शिंदे (Minakshi shinde) यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आज तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत माझी पहिल्या दिवसापासूनची जी भूमिका होती, आजही तीच असल्याचं मिनाक्षी यांनी म्हटलं.

राम पूर्णेकर यांच्या नेतृ्त्वात पूर्णेकर कुटुबीयांनी आज आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले. त्यानंतर, मागील सात तासापासून नौपाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर पूर्णेकर कुटुंबीय आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून ठिय्या सुरू आहे. जोपर्यंत पोलीस मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेंना अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा या सगळ्यांनी घेतला आहे. दुसरीकडे मिनाक्षी शिंदे यांची आज पोलिसांनी सात तास चौकशी केली.

माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका तीच आहे, पोलिसांनी जेव्हा बोलावेल तेव्हा चौकशीसाठी मी हजर राहीन. त्याप्रकारे मी पोलिसांना सहकार्य केलेलं आहे, त्यांनी बोलावल्यानंतर येऊन चौकशीला सामोरे गेले, असे मिनाक्षी शिंदे यांनी म्हटले. पुन्हा चौकशीला बोलावलंय, अजून तर कल्पना नाही, ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी मी नक्की येईन. माझ्यासोबत फोटो आहेत त्याबद्दल प्रभागात राहणाऱ्या लोकांचे फोटो माझ्यासोबत असणारच आहेत, त्याचा जर इश्शू करत असतील तर… एका भागात राहतात तर ओळखणारच ना, मी हे मागे पण तुम्हाला क्लियर केलं होतं, अशी भूमिका मिनाक्षी शिंदे यांनी मांडली.

पाखरं हाकलण्यासाठी गावामध्ये बंदुका असतात

सध्या हे पोलीस इन्वेस्टीगेशनचा भाग आहे आणि सगळ्याच गोष्टी जर मीडियासमोर एक्सपोज करायला लागले तर मग उपयोग काय? त्याला अर्थच राहत नाही. पोलिसांची चौकशी चालू आहे, त्या गोष्टी मी इथे समोर बोलायला लागले तर त्याला काय अर्थ राहील? लहानातला लहान मुलगा पण सांगू शकतो की, पाखरं हाकलण्यासाठी गावामध्ये तशा बंदुका असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये असतात त्याच्यावरती जर ते इशू करत असतील तर त्याला मी काय उत्तर देऊ, असे मिनाक्षी शिंदे यांनी म्हटलं.

पालकमंत्री शिंदे दाम्पत्यास का वाचवतात – पूर्णेकर

पोलिसांनी आम्हालाच आरोपी ठरवलं असून, माझ्या मुलाला रिक्षात कोंबून पोलीस स्टेशनला आणलं, म्हणजे आम्ही आरोपी झालो, आम्ही फिर्यादी नाही आहोत, असे म्हणत दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. क्षुल्लक गल्लीतलं भांडण झालं तरी पोलीस माणसाला उचलून नेतात, एवढा मोठा प्रूफ सगळ्यांनी बघितलाय तरी पालकमंत्री शिंदे दाम्पत्याला का वाचवतायेत? हा राजा कोण आहे? मंत्री आहे, आमदार आहे, खासदार आहे काय? आणि ही बाई कोण आहे की तिला एवढं वाचवायचा प्रयत्न? असा सवालही विजेता यांनी उपस्थित केला. तसेच, मी आज इथून हलणार नाहीय, जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस थांबणार, त्याला फरफटत पोलीस स्टेशनला आणा, दोघं नवरा-बायकोला अरेस्ट करा तेव्हाच मी जाणार, असे म्हणत पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनलाच ठिय्या मांडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!