Uncategorized
संविधान दिनानिमित्त ठाण्यात उद्या कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून’संविधान बचाव रॅली’चे आयोजन

ठाणे : संविधानाचा सन्मान, लोकशाहीचे संरक्षण आणि नागरिकांच्या हक्कांसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने उद्या, गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाण्यात भव्य राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.
ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथून दुपारी १२:१५ वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी एकजुटीने आवाज बुलंद करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या रॅलीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) महाराष्ट्र प्रभारी मा. डॉ. सिरिवेला प्रसाद आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या राज्यस्तरीय रॅलीत कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




