बीबी खास गर्लफ्रेंड झकास” 30 डिसेंबर रोजी मेहकर येथे प्रदर्शित होणार”.
प्रतिनिधि! स्नेहा उत्तम मडावी

येथील चित्रपट अभिनेते रफिक कुरेशी यांची लकी फिल्म प्रस्तुत हिंदी चित्रपट “बीबी खास गर्लफ्रेंड झकास” येत्या 30 डिसेंबर रोजी मेहकर येथील राजा चित्र मंदिर टॉकीज मध्ये प्रदर्शित होणार आहे
रफिक कुरेशी यांनी यापूर्वी हिंदी चित्रपट” हक ए सैलानी” सुलताने महाराष्ट्र” या हिंदी चित्रपटासह मराठी चित्रपट” शेतकरी पुत्र” अशी नको सुनबाई “हीच बायको पाहिजे “काळी माती” जिगरा एक संघर्ष” चिमण्या”आदि चित्रपटात उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत “बीबी खास गर्लफ्रेंड झकास” या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक ,लेखक, निर्माता हे जमील खान असून त्यांची ही अकरावा चित्रपट आहेत या चित्रपटात कलाकार म्हणून जमील खान, रफिक कुरेशी, नितल शितोळे ,ऋतुजा पाटील, डॉक्टर जितेंद्र गवळी, संतोष गावंडे, सोनार मॅडम, फिरोज चौधरी, सह निजाम नंदा वाले आदि कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका केली आहेत हा चित्रपट आपल्या कुटुंबा व परिवार सह श्रोतांनी पाहावे असे आवाहन चित्रपट अभिनेते रफिक कुरेशी यांनी एका प्रसिद्ध पत्रका द्वारे केले आहे।