Uncategorized

उल्हास नदी वाचवण्यासाठी बदलापुरात ‘जनआक्रोश’; १२ आणि १३ नोव्हेंबरला भव्य स्वाक्षरी मोहीम!

बदलापूर:
उल्हास नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, नदीचे अस्तित्व आणि आरोग्य वाचवण्यासाठी आता बदलापूरकर एकवटले आहेत. उल्हास नदी बचाव समिती‘च्या वतीने नदीच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी एका भव्य स्वाक्षरी मोहिमेचे आणि ‘जनआक्रोश’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘एक सही… संतापाची मोहीम!‘ या टॅगलाईनखाली ही चळवळ उभी राहिली असून, बदलापूर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होऊन आपला हक्क बुलंद करण्याचे आवाहन समितीने केले आहे,
दिनांक: १२ व १३ नोव्हेंबर २०२६
वेळ: सायंकाळी ५:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत
ठिकाण: बाजारपेठ, पोलीस चौकीसमोर, बदलापूर (पश्चिम) या ठिकाणी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे 
उल्हास नदी ही या भागातील लाखो लोकांची जीवनदायिनी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून वाढते औद्योगिक सांडपाणी, कचरा आणि नागरी प्रदूषणामुळे नदीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे आणि नदीचे संवर्धन करणे या प्रमुख मागण्यांसाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
“तुमची एक सही नदीच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी सर्व थरातील नागरिकांनी, तरुणांनी आणि पर्यावरणप्रेमींनी या स्वाक्षरी मोहिमेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘उल्हास नदी बचाव समिती’तर्फे करण्यात आले आहे.
चला, एकत्र येऊया… आपली उल्हास नदी वाचवूया!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!