Uncategorized
बदलापूर ! श्वानाच्या भीतीने चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; शनिनगर परिसरात हळहळ
बदलापूरच्या शनिनगरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; श्वानाच्या भीतीने चिमुकल्याचा मृत्यू

बदलापूर (प्रतिनिधी):
बदलापूर शहरातील शनिनगर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. श्वानाच्या भीतीमुळे एका निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. श्वानाची भीती बसल्याने या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक स्तरावर बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, या घटनेची नोंद घेण्यात आली असून चिमुकल्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे स्पष्ट करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आणि तपासानंतरच या घटनेमागील नेमके सत्य समोर येणार आहे.
नागरिकांचा संताप आणि प्रशासनाकडे मागणी:
बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागासह शनिनगर परिसरात भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नगरपरिषद प्रशासनाने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.