25 नोव्हेंबरला कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व शिक्षक संघटनेचे मुंबईत भव्य धरणे आंदोलन

मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली 25 नोव्हेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पदोन्नतीतील आरक्षण, जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त अनुशेष भरणे, टीईटीची सक्ती न करणे, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे, शिक्षकांना१०,२०,३० ही आश्र्वासित प्रगती योजना लागू करणे, बी एल ओ कामातून मुक्त करणे, अशैक्षणिक कामातून मुक्त करणे, सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करणे, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविणे अशा विविध मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात येणार आहे तरी सर्व मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विजयकुमार जाधव वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष, अशोक गायकवाड राज्य कार्यकारिणी सदस्य, संतोष गाढे कोकण विभागीय अध्यक्ष, किशोर भोईर सेवानिवृत्त शिक्षक संघटना,दिपक सालवे अध्यक्ष कर्मचारी संघटना ठाणे, रुपाली शेंडगे अध्यक्ष दिव्यांग संघटना यांनी केले आहे.

कर्मचार्यांचा पदोन्नोतीचा
प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी महासंघाने अनेक वेळा पाठपुरावा केला, बैठका घेतल्या, निवेदने दिली, आंदोलन केले तरी सुद्धा अद्याप ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी शिक्षक पदोन्नती पासून वंचित राहिले आहेत.
केंद्र शासनाने १५जून२०१८ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पदोन्नती आरक्षणासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकारने ही धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे




