बदलापूर !! अखेर बनावट कागदपत्रांच्या आधारे नगरपालिकेचा ठेका मिळवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल,,

कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील बहुचर्चित शुभम महिला विकास मंडळ संस्थेच्या ठेकेदारावर बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात आज दिनांक २३ आक्टोंबर २०२३ रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
मागील तीन ते चार वर्षांपासून शुभम महिला विकास मंडळ संस्थेने ठाणे महानगरपालिकेचा बनावट धुर फवारणीचा अनुभव असलेला दाखला जोडुन कुळगाव बदलापुर नगरपालिकेतुन धुर फवारणीचा ठेका मिळवला होता,कोराना काळात या धुर फवारणीच्या ठेक्या बाबत नव्याने निविदा काढण्यात आल्या नसल्याने शुभम महिला विकास मंडळ संस्थेवर कोणाचाही संशय नव्हंता, परंतु आता काही महिन्यांपूर्वी तात्कालिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांच्या देखरेखीखाली धुर फवारणीच्या ठेक्या बाबत नव्याने निविदा काढण्यात आल्या नंतर ईतर कंपन्यांच्या निविदा ह्या पारदर्शक आणि कमी खर्चात असताना देखील शुभम महिला विकास मंडळ संस्थेला पुन्हा निविदा देण्यात आली, या वेळी मात्र शुभम महिला विकास मंडळ संस्थेच्या कागदपत्रे तपासली असताना त्या मध्ये ठाणे महापालिकेचा अनुभव असलेला संशयीत दाखला जोडण्यात आला होता,हा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांनी चव्हाट्यावर आणुन सदरचा दाखला तपासणी करण्याची मागणी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या कडे करण्यात आली होती, या वेळी मुख्याधिकारी यांनी तक्रारदार आणि शुभम महिला विकास मंडळ संस्थेची एकत्रित सुनावणी आयोजित करुन दोन्ही कडून बाजु मांडण्याची संधी दिली होती, परंतु शुभम महिला विकास मंडळ संस्थेकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याने मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी तक्रारदार यांच्या मागणी नुसार शुभम महिला विकास मंडळ संस्थेने दाखल केलेल्या अनुभवाच्या दाखल्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ठाणे महापालिकेला पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितले होते, ठाणे महापालिकेने या बाबत अहवाल सादर केला असून अशा प्रकारचा कुठलाही दाखला आमच्या कडून देण्यात आला नसल्याचे ठाणे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे, या मुळे खोटा अनुभव दाखला सादर करुन या संस्थेने कुळगाव बदलापुर नगरपालिकेची देखील फसवणूक झाली असल्याचे सिद्ध झाले आहे,सदरचा प्रकार हा तात्कालिन आरोग्य विभागाच्या अधिकारी वैशाली देशमुख यांना माहिती असताना देखील देशमुख यांनी जाणुनबुजून या संस्थेला पाठीशी घातल असल्याने ठेकेदारा बरोबर वैशाली देशमुख यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय व सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे, परंतु या मध्ये वैशाली देशमुख यांचा काहीही दोष नसल्याचा निष्कर्ष कुळगाव बदलापुर नगरपालिका प्रशासनाने काढला असून वैशाली देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे तर शुभम महिला विकास मंडळ संस्थेवर भादवी कलम ४२० ४६५ ४७१ नुसार बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापुर पुर्व पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत