ताज्या घडामोडी

काय असेल अक्षय शिंदे एनकांऊटर प्रकरणातील गूढ सत्य,,,? का करावी लागली अक्षय शिंदेंच्या आई वडीलांना दोषी पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधातील याचिका स्थगित करण्याची मागणी?

कुळगाव बदलापूर पुर्व आदर्श शाळेतील अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक आत्याच्यार प्रकरणी त्याच शाळेत सफाई काम करणारा अक्षय शिंदे याला बदलापूर पुर्व पोलिसांनी अटक केली होती, “आदर्श” नावाला बट्टा लागु नये म्हणून संस्था चालकांनी हे प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु फक्त पत्रकार आणि महिला संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिके मुळे, अक्षय शिंदे याला अटक करण भाग पडल होत, राज्यातच नाही तर देशभरात या प्रकरणाचा धुरळा उडाला, महाराष्ट्र राज्यातील मातब्बर नेते, आमदार खासदार मंत्री यांची बदलापूर शहरात वर्दळ सुरू झाली आणि “आदर्श ” या नावाला बट्टा लागायचा तो लागला, आदर्श विद्या मंदिरातील मुख्याध्यापक आणि संस्था चालकांवर देखील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून गुन्हे दाखल करण्यात आले, त्या नंतर अक्षय शिंदे प्रकरणाचा तपास उच्च स्तरीय समितीने सुरू केला,,,पण अचानक प्रकरणाचा तपास करत असताना अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला,,,अक्षय शिंदे हा कोणी माफीया डॉन नव्हता किंवा नाही त्याचे उच्च स्तरीय राजकीय संबंध होते,, अक्षय शिंदे याने पोलिसांची रिव्हाॅलवर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला असल्याचे दर्शवुन स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदे याला गोळ्या घातल्या अस सांगण्यात आल,ते खरतर कोणालाच पटलेल नाही,, अक्षय शिंदे याच्या मृत्यू बद्दल कोणालाच दुःख नाही,,पण त्याच्या मृत्यूच्या मागे कोणते सत्य लपवले जाते हा मोठा प्रश्न आहे, ह्या देशाची लोकशाही संविधानावर टिकून आहे, त्या मुळे संविधान प्रेमी वकिल तसेच ईतर सामाजिक संघटनांनी या फेक एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली, उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या,, आणि प्रकरणाचा निकाल लागला,,मा, न्यायालयाने हा एन्काऊंटर फेक असल्याचे निष्पन्न करुन, संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले,, परंतु फेक एन्काऊंटर प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच लगेचच अक्षय शिंदेंच्या आई वडीलांनी फेक एन्काऊंटर प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर विरोधातील याचिका स्थगित करण्याची मागणी केली,, आणि संपूर्ण यंत्रणांच्या भुवया उंचावल्या,, असे काय कारण असेल की अक्षय शिंदेंच्या आई वडीलांना ही याचीका स्थगित करण्याची मागणी करावी लागली? याचा उलगडा होणे महत्त्वाचे आहे, नाही तर अशाच प्रकारे पोलिसांना सुपारी देऊन कायदेशीर खुन करण्यात येतील आणि अक्षय शिंदेंच्या आई वडीलां सारखे दबाव तंत्र वापरून फिर्यादीची ऐशीतैशी करुन टाकले जाईल, संविधान प्रेमी वकिलांनी मात्र आक्रमक भूमिका घेत या फेक एन्काऊंटर प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे,तो अतिशय स्वागतार्ह आहे,अशाच वकिलांची समाजाला अत्यंत गरज आहे,आता उच्च न्यायालय या प्रकरणात नक्की कोणती भूमिका घेणार आहे हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.