कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित तिळगुळ समारंभ आज काँग्रेस कार्यालय बदलापूर येथे संपन्न

कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव यांच्या सुचनेनुसार उपाध्यक्ष सौ मनीषा राजेश पोळ यांनी दिनांक ९/२/२०२४ रोजी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजित केले होते
या कार्यक्रमाला सर्व महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला या कार्यक्रमासाठी दुर्गा ब्रिगेडच्या कांचन भावसार , जागोरी संघटनेच्या सविता चिवे तसेच बदलापूर येथे आरोग्य विभागामध्ये आशा सेविका म्हणून काम करणाऱ्या संजीवनी पाटील ,कविता कुमावत,याच बरोबर समता महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या तसेच त्यांचे सहकारी यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल आणि श्रीफळ देऊन ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला….
या कार्यक्रमाला काँग्रेसच्या पदाधिकारी साधनाताई ओव्हाळ, हेमलता सरय्या, केतकी सोनवणे, माही शेट्टी, शीला मॅडम, निशा कटारनवरे, यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी बजावली,