ताज्या घडामोडी

कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष सन्माननीय मा. आमदार हर्षवर्धन सपकाळ* यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे संपन्न,,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त *प्रदेशाध्यक्ष सन्माननीय मा. आमदार हर्षवर्धन सपकाळ* यांचा पदग्रहण समारंभ आज बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे काँग्रेस पक्षातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी *माजी प्रदेशाध्यक्ष सन्मा. नानाभाऊ पटोले*, महाराष्ट्र प्रभारी सन्मा. रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सन्मा. सुशीलकुमार शिंदे आणि सन्मा. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सन्मा. बाळासाहेब थोरात, सन्मा. विजय वडेट्टीवार (काँग्रेस विधिमंडळ नेते), सन्मा. वर्षाताई गायकवाड (खासदार), सन्मा. नसीम खान, सन्मा. अस्लम शेख, सन्मा. चंद्रकांत हंडोरे (खासदार), सन्मा. अमित देशमुख, सन्मा. यशोमती ठाकूर तसेच अनेक आजी /माजी खासदार, अनेक आजी/माजी आमदार, राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे *प्रदेश प्रमुख श्री समीर सुभाष वर्तक यांनी सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ* यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. Sobat पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष *श्री सुरेश गवळी (जालना), प्रदेश सरचिटणीस श्री अम्मार पटेल ( वसई विरार), सौ. वर्षा शिखरे (कल्याण डोंबिवली), श्री सच्चीदानंद बुगडे (सिंधुदुर्ग), प्रदेश सचिव श्री अनिल चौगुले (नवी मुंबई), श्री प्रमोद पंडीत (पुणे), श्री अभिजीत कांबळे (मुलुंड), जिल्हाप्रमुख श्री डेरीक फुर्टाडो (वसई विरार), श्री विजय पाटील (बुलढाणा), श्री मनोज डाकवे (ठाणे शहर), श्री सुरेश पाटील (पनवेल), श्री राजीव पाटील (रायगड), श्री अक्षय शहरकर (पिंपरी चिंचवड), श्री नौशाद अन्सारी (भिवंडी) आणि श्री चेतन पाटील (सांगली ग्रामीण) हे सर्व जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांसह तसेच वसई विरार पर्यावरण विभाग जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय पाटील, सचिव श्री संदेश भोईर, श्री अशोक गुरव, श्री सुनील डावरे, मौलाना जिया उल हक आणि गाझी पटेल आणि अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.