बदलापूर पुर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची हिंदी शिक्षा प्रसार मंडळ शाळेतील विश्वस्थांना बेदम मारहाण करण्याची धमकी,,,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या कार्यपद्धतीवर संशय

कुळगाव बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंदी शिक्षा प्रसार मंडळ कुळगाव बदलापूर पी टी आर न,एफ_१७२३/ठाणे या संस्थेचे सदस्य श्री अहमद सई खान शिक्षा बचाव समितीचे अध्यक्ष डी आर सिंह यांनी, हिंदी शिक्षा प्रसार मंडळ शाळे मध्ये संस्थेचे सध्याचे अध्यक्ष मनोज शुक्ला यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे शिरकाव केला असल्या प्रकरणी, तसेच शाळे मध्ये सुरू असलेल्या गैरकारभारा प्रकरणी धर्मदाय आयुक्त ठाणे यांच्या कडे याचीका दाखल केली असून या सुनावनी प्रलंबित आहे, शाळेमध्ये बेकायदेशीर शिक्षक भरती तसेच कर्मचारी भरती देखील केली जात असल्याने काही सदस्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करुन चौकशीची मागणी केली आहे, अशा प्रकारे सुरू असलेला प्रकार आपल्या अंगावर येऊ नये म्हणून मनोज शुक्ला हे पुराव्यांचे कागदपत्र नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शाळेतील काही सदस्यांनी केला आहे, याच अनुषंगाने दिनांक २७/२/२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मनोज शुक्ला यांनी शाळेतील विश्वस्त मंडळाचे सदस्य अहमद खान यांना शाळेतील कागदपत्रांची चोरी झाली असल्याचे फोन करून सांगितले असताना, अहमद खान यांनी मनोज शुक्ला यांना या बाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला, परंतु मनोज शुक्ला यांनी कोणतीही तक्रार दाखल न करता वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना थेट शाळेत बोलावून घेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी देखील रितसर तक्रार नसताना आपल्या बरोबर एका महिला पोलिस अधिकारी घेऊन शाळेत जाऊन चौकशी केली केली,ही बाब ईतर शाळेचे सदस्य अहमद खान, शिक्षण बचाव समितीचे अध्यक्ष डि आर सिंह यांना समजल्यावर त्यांनी काही पत्रकारांसह पोलिस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांना शाळेचे अध्यक्ष मनोज शुक्ला हा चोरीचा बनाव करून कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत माहिती देत त्यांना त्या बाबत लेखी निवेदन दिले असल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी तुम्ही जास्त शहाणपणा करु नका,नाहीतर तुम्हाला दांडक्याने बडवुन काढिल अशा प्रकारची धमकी देऊन ऊलट अर्थी शाळेच्या सदस्यांच दमदाटी केली, या मुळे शाळा प्रशासनाकडून कोणतीही रितसर चोरीची तक्रार नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाळेमध्ये कोणत्या कामासाठी गेले होते,? वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची ही भाषा पुर्णपणे असविंधानिक आहे,विश्वस्त मंडळाचा प्रश्न हा न्याय प्रविष्ट आहे, अशा वेळी शाळेतील आक्षेपार्ह कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी रितसर तक्रार दाखल करुन चौकशी करणे गरजेचे आहे, परंतु तसे न करता ईतर सदस्यांना कोणतीही पुर्व सुचना न देता
विना तक्रार शाळेत गेल्याने आणि शाळेच्या सदस्यांना काठीने बेदम मारहाण करण्याची धमकी देणे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करण्यासारख असुन, वरिष्ठ पातळीवर या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे, या साठी आपण ठाणे जिल्हा पोलिस आयुक्त यांना निवेदन सादर करुन कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी म्हटले आहे