येवला तालुकयातील एरंडगाव जलसंपदा कार्यालयासमोर पाट पाण्यासाठी प्रहारचे उपोषण,,, उपोषणाचा तिसरा दिवस,
प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-:येवला तालुक्यातील एरंडगाव बु : येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने च्या पालखेडच्या पाट पाण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून
सध्या सुरू असलेल्या पालखेड पाटबंधारे डावा कालवा आवर्तनातून येवला पश्चिम भागातील वितरकांना पाट पाणी सोडावे या प्रमुख मागणीसाठी, सोमवार (दि. ९) पासून उपोषणास सुरुवात झाली असून झाली असून पालखेडचे पाटबंधारे अभियंता येवला यांना निवेदन दिले दिले आहे. मात्र, संबंधित अधिकारी कार्यालय बंद असल्याने निवेदनाची प्रत बंद दरवाजावर चिकटवून देत प्रहार चे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील एरंडगाव येथे उपोषणास सुरुवात केली आहे
तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने अद्याप पिण्यासाठीदेखील विहिरींना पाणी नाही. सध्या २० ते २५ दिवसांपासून पालखेड कालव्यास पूरपाणी आवर्तन सुरू आहे. पश्चिम विभागातील चाऱ्यांना अत्यल्प पाणी सोडण्यात येऊन पाणी बंद केल्याने परिसरात जनावरांसह वाडी वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून येवल्यातील पश्चिम विभागातील चाऱ्याना पाणी न सोडल्याने दिनांक 9 /10 /2023 रोजी सकाळी ११ वाजता परिसरातील शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने पालखेड कालवा कार्यालय एरंडगाव येथे उपोषण आंदोलन सुरू असून जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील, असे प्रहारतर्फे सांगण्यात आले आहे. पत्र घेण्यास कार्यालयात अधिकारी वा कर्मचारी कुणीच नसल्याने कुलूपबंद कार्यालयास निवेदन चिकटवून त्याचे फोटो उपअभियंता व कार्यकारी अभियंता याना पाठविण्यात आले आहेत.
पाण्याबाबत पालखेड कालवा विभागाकडून नेहमीच दुजाभाव होत ,पाणी वेळेवर व आवश्यक तेवढे न मिळणे नित्याचेच झाले असल्याचा आरोप यावेळी प्रहारच्या वतीने करण्यात आला त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटास तोंड द्यावे लागते. यास केवळ पालखेड कालवा विभाग जबाबदार असून यापुढे हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला
परिसरातील वितरिकांना त्वरित पाणी सोडण्याची मागणी यावेळी प्रहार च्या वतीने तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी इशारा दिला आहे