दिनांक ३० मार्च २०२३ रोजी रिपब्लिकन सेना कवी-गायक-वादक, कलावंत कार्यकर्ते यांचा मेळावा

*म. फुलेंची सत्यशोधकी चळवळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मानवमुक्तीची चळवळ या चळवळीतील म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सोपे करुन कलेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या भाषेत समजावून सांगणारे सत्यशोधकी जलसाकार व आंबेडकरी जलसाकार यांचा वारसा आजची समर्थपणे चालवणारे रिपब्लिकन सेना कवी-गायक-वादक या कलावंताचा मेळावा गुरुवार दि. ३० मार्च २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजि करण्यात येत आहे*.
*सरसेनानी आनंदराज आंबेडकर संस्थापित रिपब्लिकन सेनेच्या रिपब्लिकन कलामंच या शाखेने आयोजित केलेल्या या मेळाव्यास महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक, प्रबोधकार, विद्यार्थी प्रिय शिक्षक, राजगृहाकडे चला संदेश यात्रेचे मुख्य प्रवर्तक, लेखक व विचारवंत मा. श्रीपती ढोले सर रिपब्लिकन सेना कलावंतांची प्रबोधनाची दिशा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसचे कलावंतांच्या समस्या समजून घेऊन सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच रिपब्लिकन सेनेचे ईशान्य मुंबई अध्यक्ष विजय माने हे कलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष पुढाकार घेणार आहेत. तरी खासकरुन मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्हयातील रिपब्लिकन कवी-गायक-वादक कलावंतांनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात व वर्तमान काळात, प्रबोधनाची दिशा समजून घ्यावी, असे आवाहन या मेळाव्याचे संयोजक व रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निरिक्षक विक्रम खरे यांनी केले आहे. स्थळ : संबोधी विहार, इंदिरा नगर, ओटी सेक्शन, उल्हासनगर -०४ येथे दुपारी ४.०० वाजता हा मेळावा संपन्न होणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील कलावंतानी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे मेळावे आयोजित करुन कलावंताची एक मोठी चळवळ उभी करण्यात येईल असेही संयोजकांकडुन सांगण्यात आले आहे,