कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्या आदेशानुसार ठाणे शहरात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन
प्रतिनिधी नरसिंग कट्टा

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात केंद्र सरकारने सुडबुध्दीने सक्त वसुली संचनालया कडुन नोटीस बजावली असल्याने देशभरात कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ दिनांक २६ जुलै २०२२ रोजी आंदोलन सुरू केले,
, सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात ठिक ठिकाणी शांतता सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या आदेशानुसार ठाणे शहरा मध्ये देखील कॉंग्रेस जिल्हा महिला अध्यक्षा सौ वैशाली भोसले आणि ठाणे शहर ( जिल्हा) अध्यक्ष ऍड, श्री विक्रांत भिमसेन चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, केंद्र सरकार महागाई आणि चुकीच्या धोरणांमुळे अपयश लपवण्या साठी अशा प्रकारच्या कारवाया करत असल्याचे सांगून ठाणे शहरात सदरचे निषेध आंदोलन करण्यात आले, आंदोलनाला ठाणे शहरातुन मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत ठाणे परिसर दणाणून सोडला असल्याचे बघायला मिळाले,