रविवार दिनांक 5मार्च 2023, शेई विभाग हायस्कुल शेई ता. शहापूर या विद्यालयात मार्च 1987बॅच चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न,,.

शेई विभाग हायस्कुल शेई या विद्यालयातील मार्च 87बॅच चे स्नेह संमेलन (गेट टुगेदर )रविवार दिनांक 5मार्च 2023रोजी विद्यालयात शिकवणाऱ्या सर्व गुरुजनांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार समर्पण करून करण्यात आली.विद्यालयातील विद्यार्थिनींनी सुश्राव्य असे ईश स्तवन, स्वागतगीत गायन केले.या प्रसंगी सर्व गुरुजणांचे गुलाबपुष्प व मानाचे वस्र भेट देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
विद्यालयालातील सर्व कार्यरत शिक्षकांचा गुलाबपुष्प व मानवस्र भेट देऊन आदराने सन्मान करण्यात आला तसेच विद्यालयास 6 वर्गासाठी 6व्हाईट बोर्ड, मार्कर, डस्टर भेट देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल उबाळे यांनी केले व सर्वांचे आभार कमलाकर विशे यांनी मानले भोजन व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी गुरुनाथ परटोले व शिवाजी तारमळे यांनी पार पाडली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्च 87बॅच च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमा नंतर सर्वांनी गुरुजनांसोबत सहभोजनाचा आनंद घेतला.