ऑल इंडिया क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशनची महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न ,,,

ऑल इंडिया क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशनची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संस्थेचे अध्यक्ष *श्री महादेव शिंदे* यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झाली. महिलांवर, बाल मंजुरांवरती व पिढीतांवरती होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उचलण्याची घोषणा देखील संस्थेचे सचिव *श्री साईनाथ खरात* यांनी केली. संस्थेच्या सदस्यांसाठी व पीडित वंचित लोकांकरिता संस्था व संस्थेचे पदाधिकारी २४ तास सेवेत तत्पर्य राहतील असे देखील संस्थेचे *अध्यक्ष श्री महादेव शिंदे* यांनी बैठकीत मत व्यक्त केले. समाजसेविका *सौ. ज्योतीताई चव्हाण,* सामाजिक कार्यकर्त्या व संस्थेच्या फाउंडर मेंबर *सौ साक्षी मिश्रा मॅडम,* रिक्षा चालक व मालक संगठनेच्या *सौ जयश्री आहिरे,* युट्युबर *श्री मुन्ना अग्रवाल* समाजसेवक *श्री अशोक दहिवळकर (मामा)* ह्यांनी देखील समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात वाचा फोडण्याकरिता एकजुटीने संस्थेच्या नेतृत्वाखाली बंड पुकारले पाहिजे. असे आवाहन बैठकीत मार्गदर्शन करताना केले. सदर बैठकीत पत्रकार राहुल मुंडे, सुशीलाताई बांगर, हसन भाई शेख अफरीनताई खान, संदीप कडलक, सुचित्राताई स्वामी,अनिल बावसकर, सविताताई शिंदे, गुड्डू भाई, शरीफ पठाण, विकास गायकवाड व ठाणे, कल्याण, मुलुंड, मुंबई तसेच इतर शहरातून पदाधिकारी उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष महादेव शिंदे सचिव साईनाथ खरात सुशीला बांगर अफरीन खान यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम केले.