मुरबाड मधिल डॉक्टरांच्या अपहरण प्रकरणी फरारी असलेले आरोपी मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात
मुरबाड (प्रतिनिधी: अरुण ठाकरे)

मुरबाड शहरातील तज्ञ डॉ. जितेंद्र बेंढारी यांचे सात महिन्या पूर्वी घडलेल्या अपहरणाच्या प्रकरणी तालुक्यातील डॉक्टरांसह संपूर्ण मुरबाड तालुक्यात दहशतीच वातावरण पसरले होते.मात्र मुरबाड तालुक्याला पहिल्यांदाच कर्तव्याला जगणारा पोलिस अधिकारी लाभल्याने आत्ता पर्यंत अनेक गुन्हाचा तपास लावून गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे, डॉ.बेंडारींच्या अपहरण प्रकरणातील गुन्हेगारांना मुरबाड पोलिसांनी पकडून बेड्या ठोकल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुरबाड तालुक्या सह सर्वत्र मुरबाड पोलिस्टेशनंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्यासह सर्व पोलिस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुरबाड शहारात बस स्टॅण्ड लगत डॉ, बेंढारी यांचे तन्मय मॅटर्निटी नावाचे हॉस्पिटल गेली अनेक वर्षांपासून कार्यरत असून नेहमी प्रमाणे डॉक्टर बेंढारी काम करून निघाले असताना दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकी वरून घरी परतत असताना त्यांना अज्ञात इसमाने हात करून काही अंतरावर सोडण्यास सांगितले. कोणी तरी ओळखीचा असावा असा विचार करून गाडी थांबली आणी अपहरणाचा थरार चालू झाला. गाडी वर बसताच पुढे जाऊन त्यांचे अपहरण झाले व अपहरण कर्त्यांना ३० लाख रुपये देऊन डॉ. बेंढारी यांनी आपली सुटका केल्याचे सांगितले.
घटनेची फिर्याद डॉ. बेंढारी यांनी दि. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुरबाड पोलिस सस्टेशनला नोंदवली. त्यानुसार मुरबाड पोलिसांनी, मुरबाड पो. स्टे. गु. र. क्र. ३३७/२२ क ३६४, ३८७, ३४१, ३४२, ३२३, ५०४, ५०६ भां. द. वी. अन्वये दाखल गुन्हा नोंदवून कोणत्याही धाग्यादोऱ्यां अभावी तपासला सुरुवात केली व (दि.२० रोजी) आरोपितांना बेड्या ठोकण्यात मुरबाड पोलिसांना यश आले आहे.
आरोपींना शहापूर कोर्टात हजर केले असता दि. २७ तारखेपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेतील ५ आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून यातील ३ आरोपी मुरबाड तालुक्यातील देवगाव, एक शिरवली व एक बदलापूर येथील आहेत. तर अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. सदर गुन्ह्यात जलद तपास करून आणखीन दोन आरोपींना अटक केली आहे” अशी माहिती मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.
पोलिसी तपास कार्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिस स्टेशनचे व.पो.नि. प्रसाद पांढरे, सपोनि अनिल सोनोने, पीएसआय अरुण सावंत, नरेश निंबाळकर, रामेश्वर तळेकर, सफौ. भगवान निचीते, पो.ना. अमोल माळी, सचिन उदमले, तांत्रिक अंमलदार दीपक गायकवाड, पो.शि. चालक शरद शिरसाट यांनी विशेष मेहनत घेतली.