भिवंडी मध्ये तिन मजली ईमारत कोसळुन दोघांचा मृत्यू तर अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली,,,,,,,
ढिगाऱ्याखाली अधिक मृतदेह सापडण्याची शक्यता

आज दिनांक २९/०४/२०२३ रोजी १३:०० वाजताच्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार वर्धमान कंपाऊंड, वाल व्हिलेज, दापोडा मार्ग, भिवंडी ग्रामीण, भिवंडी. या ठिकाणी मे. एम.आर.के. फुड्स (तळ+०३ मजली इमारत, अंदाजे १० वर्षे जुनी इमारत) ही इमारत कोसळली आहे. सदर घटनास्थळी इमारतीमध्ये अंदाजे २२-रहिवाशी अडकले असल्याची शक्यता आहे.
सदर घटनास्थळी प्रांत अधिकारी, तहसिलदार-भिवंडी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-ठाणे महानगरपालिका, ग्रामसेवक-भिवंडी ग्रामीण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-०२, भिवंडी पोलीस कर्मचारी, दंगलग्रस्त पोलीस कर्मचारी, शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडीचे कर्मचारी-१० रुग्णवाहिका, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान-०१ इमर्जन्सी टेंडरसह व ०१-रेस्क्यु वाहनासह, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) अधिकारी व कर्मचारी ०१-आयशर टेम्पोसह व ०१-बस वाहनासह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान-०१ बस वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी (ठाणे महानगरपालिक, ठाणे), भिवंडी महानगरपालिकेचे कर्मचारी ०२-हायड्रा माशिनसह उपस्थित आहेत.
मा. केंद्रीय मंत्री पंचायती राज, राज्यमंत्री श्री. कपिल पाटील साहेब घटनास्थळी दाखल
मा. ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक सिनगारे साहेब व सहाय्यक आयुक्त (भिवंडी महानगरपालिका) श्रीमती. प्रणाली घोंगे घटनास्थळी उपस्थित.
सदर घटनास्थळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने सदर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकूण-११ रहिवाशांची सुटका करण्यात आली असून, त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
घटनास्थळी ०२-रहिवाशांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढून भिवंडी पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
मृत व्यक्तींच्या तपशिल पुढीलप्रमाणे:-
१) श्री. नवनाथ सावंत (पु./वय- ४० वर्षे)
२) श्रीमती. लक्ष्मीदेवी रवी म्हातो (स्त्री./वय- २६ वर्षे)
घटनास्थळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्यामार्फत बचावकार्य सुरू आहे.