शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच बोलबाला,,,,

बदलापूर मधुन सुमारे एक हजार शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात सामिल झाले होते, बदलापुर शहर ग्रामीण परिसरातील शिवसैनिक एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाएकी मेळाव्याला जाण्यासाठी प्रकट झाल्याने बदलापुर मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली नसुन अधिक जोमाने कामाला लागली असल्याचा एक प्रकारचा संदेशच शिंदे गटाला या शिवसैनिकांनी दिला आहे अस समजायला काहीच हरकत नाही,
मुंबई मध्ये शिव तिर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर बिकेशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आयोजित केला होता, उध्दव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे होत असलेला दसरा मेळावा यशस्वीपणे पार पडला पण दुसरीकडे आपल शक्ति प्रदर्शन करायला गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र अक्षरक्ष:पोपट झाला, गेले अनेक दिवसांपासून या दोन्ही मेळाव्यांची चर्चा महाराष्ट्रतच नाही तर संपूर्ण देशभरात रंगली होती,
खरी शिवसेना कोणाची हे या दसरा मेळाव्यातुनच सिध्द होणार होते, या मेळाव्यात शिवसेशेच संयमी पण कणखर नेतृत्व म्हणून उध्दव ठाकरे यांची नवीन ओळख निर्माण झाली, कोणताही गाजावाजा न करता गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होईल असे उध्दव ठाकरे यांनी ठासून सांगितले होते, मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करत एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना शिवतीर्थ मिळणारं नाही याचा चोख बंदोबस्त केला होता, परंतु उध्दव ठाकरे यांनी संयम ठेवून ऊच्च न्यायालयातुन ही परवनागी मिळवलीच,खर म्हणजे शिवसेना ही उध्दव ठाकरे यांचीच आहे याची ही पहिली नांदी होती,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवतीर्थ मिळाले नाही, म्हणून त्यांनी बिकेशीवर दसरा मेळाव्याचे आयोजन केले, आणि सुरू झाला शक्ती प्रदर्शनाचा संघर्ष,,खर सांगायच तर या संघर्षात फक्त एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतून फुटुन गेलेले आमदार यांचीच दमछाक झाली असल्याचे दिसून येत होते,
कोणत्याही परिस्थितीत BKC वर मोठी गर्दी करुन राज्यातील शिवसैनिक हे आमच्याच मागे आहेत हे दाखवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न होता,,पण,,,, शिंदे गटाचा पोपट झाला,,,, उध्दव ठाकरे हे दसरा मेळाव्याची घोषणा करुन निवांत होते, त्यांना त्यांच्या निष्ठावान शिवसैनिकांवर कमालीचा विश्वास होता आणि शिवसैनिक देखील उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाला पात्र ठरले,हा,,हा,,म्हणता राज्यातील जिल्हा,तालुका शहर, गावखेड्यातुन स्वयंम प्रेरणेतून शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे शिवतीर्थावर जाण्यासाठी निघाले होते, आणि बघता बघता शिवतीर्थ तुडुंब भरून गेले, वातावरणच भगवेमय झाले,
दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्या सह अनेक नेत्यांनी तर या मेळाव्याची कमान सांभाळली, आणि त्या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला शिवसैनिकांकडुन जो प्रतिसाद मिळाला त्याला तोडच नाही,
शिवसैनिक उस्फुर्ततपणे उध्दव ठाकरे यांच्या प्रत्येक वाक्याला प्रतिसाद देत होते, अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनटांच्या भाषणात उध्दव ठाकरे यांनी सगळ्यांचीच मने जिंकली आणि खऱ्या अर्थाने हा मेळावा यशस्वी केला,,,, तिकडे BKC वर गर्दी करण्यासाठी शिंदे गटानी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, शिंदे गटातील आमदारांनी आपल्याला जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात भाडोत्री माणस शिवसैनिक म्हणून ऊभी केली,
खुद्द प्रसार माध्यमांनीच याचा भांडाफोड केला आहे, जिल्ह्या जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात गोरगरीब नागरिकांना विविध अमिष दाखवून जबरदस्तीने आणले असल्याचे प्रकर्षाने दिसून येत होते,खर म्हणजे या लोकांना आपण मुंबई मध्ये कशा साठी आलो आहे हे देखील माहिती नव्हते, सरपंचांनी सांगितले म्हणून आम्ही आलो, आमदारांनी सांगितले म्हणून आम्ही आलो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिंदे गटा कडून आणलेल्या लोकांच्या होत्या, मेळाव्यात गर्दी तर झाली होती पण धरुन बांधून आणलेली गर्दी होती हे स्पष्ट दिसत होते, मेळाव्यात फक्त आम्ही गद्दार नाहीत हेच सांगण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येक आमदार करताना दिसत होते,पण हिंदुत्ववाच्या नावा खाली भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडणारी ही मंडळी स्वतःच्या पक्षाची झाली नाहीत ती ईतर कोणाची कशी होतील? हा साधा विचार न कळणारी जनता मुर्ख नाही,
देशाला हुकुमशाही राजवटीकडे नेत असलेल्या भाजपशी हातमिळवणी हा शिंदे गटाचा मोठा गुन्हा आहे, ईडीच शस्त्र वापरुन देशातल राजकीय वातावरण बिघडण्याच काम सातत्याने भाजपा करत आहे,वाढती महागाई आणि बेरोजगारी जातीय वाद,अस्थिरता, ही देशातल्या नागरिकांची प्रमुख समस्या आहे, जनतेचे मुळ प्रश्न बाजूला ठेवून सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या भाजपाला शिंदे गटाने दिलेली साथ त्यांना आगामी काळात भारीच पडणार आहे हे नक्की,कारण माजी मुख्यमंत्री तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच अवघा महाराष्ट्र हळहळला होता, आणि राज्यातील सर्वच ईतर राजकीय, सामाजिक संघटनां उध्दव ठाकरे यांच्या बाजूने उभ्या राहिल्या, त्या मुळे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर मतदारांचा कौल नाहिच ते सगळ्यांना दसरा मेळाव्यात बघायला मिळाले, एकनाथ शिंदे कागदावर लिहून आणलेल भाषण करत असताना,भाषण सुरू होताच लोकांनी बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला, एकनाथ शिंदे यांना जनतेला काय संदेश द्यायचा होता कोणाला काहीच कळत नव्हत,शाळेतला धडा वाचून बोलत असल्याचच दिसून येत होत, म्हणतात ना, “करायल गेले गणपती, झाला मारोती” आता मात्र भारतीय जनता पक्ष सावध भूमिका घेतल्या शिवाय राहणार नाही, शिंदे गटाची झालेली नाचक्की आणि उध्दव ठाकरे यांना मिळत असलेला जनाधार हा महाराष्ट्रत भाजपाचा धोबी पिछाड केल्या शिवाय राहणार नाही, म्हणून एकनाथ शिंदे गटाला सोबत ठेवणे भाजपाला परवडणारे नाही त्यामुळे भाजपाच होईल ते होईल पण जनाधार नसलेल्या शिंदे गटाच कस होणार,,,याची चिंता आता शिंदे गटाला नक्कीच करावी लागणार आहे