जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत विद्यार्थांना शालेय लेखन साहित्य व फळं वाटप

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी,भिवंडी येथे दि.12/10/2023 रोजी IWC फाऊंडेशन भिवंडी (म.रा. )चे अध्यक्ष केंद्रप्रमुख प्रभाकर जाधव सर यांनी शाळेत उपस्थित राहून 53 विद्यार्थांना शालेय लेखन साहित्य (पेन, पेन्सिल, खोडरबर, शाॅपनर, पट्टी) तसेच प्रत्येकी दोन संत्रा फळे वाटप करण्यात आली.
यावेळी केंद्रप्रमुख प्रभाकर जाधव सर यांनी विद्यार्थांशी हितगुज करत प्रश्नोत्तरातून चर्चा केली व शैक्षणिक मार्गदर्शन केले. शिक्षण ही काळाची गरज आहे खूप अभ्यास करून आपण उच्च शिक्षण घेतले पाहिजे असा उपदेश केला. तसेच या शाळेत शिक्षक अनेक शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनीय उपक्रम राबवत असतात याचे मला कौतुक वाटते असे बोलून विद्यार्थी व शिक्षकाचे भरभरून कौतुक केले. माझे या शाळेला नेहमीच सर्व प्रकारचे सहकार्य राहील असे आश्वासित केले.
मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी केंद्रप्रमुख प्रभाकर जाधव सर यांचे शाल,गुलाब पुष्प व शिवाजी कोण होता? हे पुस्तक देऊन यथोचित स्वागत केले. सहशिक्षिका दिलशाद शेख मॅडम यांनी आभार व्यक्त केले.