सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ फापे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप,,

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,भिवंडी येथे 2 मार्च 2023 रोजी सामाजिक कार्यकर्ते, मनसे सैनिक कौस्तुभ फापे यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
प्रथम जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा वतीने सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ फापे यांना शिवाजी कोण होता? हे पुस्तक व शाल मुख्याध्यापक जगदीश जाधव व सहशिक्षक अशोक गायकवाड यांचे हस्ते देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या
तसेच शैलेश बिडवी साहेब भिवंडी लोकसभा अध्यक्ष, रविंद्र विशे साहेब उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य,अविनाश जाधव पडघा उपशहर प्रमुख, अनिल चितळे सदस्य मनसे यांचा शिवाजी कोण होता? हे पुस्तक भेट देऊन शाळेच्या वतीने स्वागत केले
तसेच उपस्थित सर्वांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या व चाॅकलेट देऊन वाढदिवस साजरा केला.
या वेळी शैलेश बिडवी साहेब यांनी मनोगतात सांगितले की,समाजातील लोकांनी आपले वाढदिवस विद्यार्थांना शालेय लेखन साहित्य किंवा शाळेला योग्य वस्तू भेट देऊन साजरे केले पाहिजेत
सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले