बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथावर आधारित राज्यस्तरीय परिक्षा बदलापूरात यशस्वीपणे संपन्न

बदलापूरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित १०० गुणांची राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात आली.
“श्री बी जी वाघ फाऊंडेशन जामनेर “,, आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, “बौद्ध अध्ययन व संशोधन केंद्र”, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वरत्न राष्टनिर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुध्द आणि त्यांचा धम्म”या ग्रंथावर आधारित असलेल्या अभ्यासक्रम नुसार दिनांक १२/११/२०२३सकाळी ११ते १२
या वेळेत परीक्षेचे आयोजन वेळापत्रकानुसार धम्मभगिनी सन्माननीय आयुनी.रंजनाताई नरवाडे, सन्माननीय आयुनी.संध्याताई भगवान नरवाडे व काही महिला भगिनींच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम गार्डन (कात्रप-बदलापूर, पूर्व) येथे घेण्यात आली.
यावेळी पर्यवेक्षक म्हणून शिक्षणप्रेमी,समाज सेवक सन्माननीय आयु.आनंद सोनकांबळे सर यांनी काम पाहिले.
अतिशय नियोजनबद्ध व परीक्षा गांभिर्य लक्षात घेऊन परिक्षार्थींनी परिक्षेत आपला सहभाग नोंदविला.यात आयु. संजय प्रकाश कुरे सर (उच्च श्रेणी- मुख्याध्यापक),लघु लेखक,विधी व न्याय विभाग मंत्रालय-मुबंई हे परिक्षार्थी म्हणून परीक्षा देत होते.याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या पाली भाषेच्या अभ्यासिका आयुनी.रुपालीताई संतोष कांबळे,आयुनी.कांताताई गजभिये तसेच प्रबुद्ध सामाजिक सेवा संस्था पदाधिकारी आयु.नवनित तायडे,परदेश भाषा अनुवादक आयु.संतोष कांबळे,धम्म उपासक आयु.विशाल माने यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली.
दीपदानोत्सवाच्या सुट्टीच्या निमित्ताने सदर परिक्षा आयोजनाबद्दल परिक्षार्थींनी आयोजकांचे जळगावहून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका बदलापूरात पाठवून देऊन सहकार्य करणा-या आयु.संदीप वाघ सर यांचे शतशः आभार मानले.