बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक शैलेश वडनरे यांची नियुक्ती,,,

कुळगाव बदलापुर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अध्यक्ष पदी,कुळगाव बदलापुर नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री शैलेश वडनरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी नुकतेच काही आमदारांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षा बरोबर संधान बांधले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील आता दोन गट पडले आहेत, या मध्ये शरद पवार यांच्या बरोबर असलेल्या पदाधिकारी यांनी बदलापुर शहरात मोर्चे बांधणी सुरू केली असून,याच अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा प्रभारी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच नियुक्ती पत्र देऊन शैलेश वडनरे यांच्यावर बदलापुर शहराची जबाबदारी सोपवली आहे,
या वेळी पक्षाचे राज्य प्रवक्ते श्री महेश तपासे श्री नदिम सिद्दिकी, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार, ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष संजय कराळे सेवा दल जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत यशवंतराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते,