मुंबई आझाद मैदानावर भरली बेरोजगारांची भव्य संसद,,सरकारी आदेशांची होळी करण्याचा घेतला निर्णय

मुंबई आझाद मैदानावर नुकतेच बेरोजगारांच्या संसद सभेचे आयोजन करण्यात आले होते, बेरोजगार मोर्चाच्या वतीने सदरच्या बेरोजगार संसदेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी बोगस वल्गना करणाऱ्या मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला गेला
,काळे धन भारतात परत आणतो दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या, अशा थापा मारुन जनतेची फसवणूक करत सरकारी नोकऱ्या बंद करुन खासगीकरण केल्या बाबत या संसंदेत मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला,
येत्या काळात ४४ हजार गावांमध्ये बेरोजगारांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारी आदेशाची होळी करणे आणि लोकशाहीची हत्या करणारी ई व्ही एम मशिन येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत फोडण्याचा ठराव या संसदे मध्ये पारित करण्यात आला,भरती प्रक्रिया मधुन पाचशे रुपये प्रति अशी करोडो रुपयांच्या बचती मधुन बेरोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेरोजगार भत्ता देणे गरजेचे असताना तसे न करता राजकीय नेते स्वतःचे ऊखळ पांढरे करण्यातच धन्यता मानत आहेत ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मत भारतीय बेरोजगार मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक प्राध्यापक डॉ विलास खरात यांनी व्यक्त केले,जर निवडुन गेलेले लोकप्रतिनिधी नालायक असतील तर आम्ही लायक लोकांनी विधानसभा तसेच संसंदेत गेल पाहिजे, त्या साठी आता आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन उत्तर प्रदेशचे पुर्व न्यायाधीश यांनी संसदेच्या उद्धाटन प्रसंगी केले,
बेरोजगारी वाढली कशा मुळे,ई व्ही एम ने निवडुन दिले म्हणून विद्यार्थी बेरोजगारांची गरजच संपली का? आमच्या बेरोजगारांचा भत्ता पेशंन्श म्हणून भिक कशासाठी घेता,,अशा अनेक प्रश्नांवर या संसंदेत मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला गेला, या वेळी बेरोजगार मोर्चाचे प्रभारी सिध्दांत मोर्या, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक ऍड, सिद्धार्थ इंगळे एम एस युके लंडनचे प्रनोती वासनिक,व सामाजिक कार्यकर्त्ये लहु पाटील, अशोक गवारे, राजाभाऊ कदम आदी मान्यवरांनी आपली प्रभावी मते मांडली,