राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ऍड, दिनेश ठाकरे यांची नियुक्ती
राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

मुंबई! राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदि ऍड दिनेश ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते दिनेश ठाकरे यांना त्या बाबत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले, शनिवार दिनांक ११ मार्चा २०२३ मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार भवन या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा व पदग्रहण समारंभ सोहळ्याचे आयोजन मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने करण्यात आले होते,
या वेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला, ऍड दिनेश ठाकरे हे ठाणे जिल्ह्यातील बदलापुर शहरातील रहिवासी असून वकिली हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे, बदलापुर शहरातील सानेवाडी या ठिकाणी त्यांचे मुख्य कार्यालय असून याच ठिकाणी त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे, ऍड दिनेश ठाकरे यांच्यावर आंबेडकरी विचारांचा पगडा असल्याने वकिल पेशा बरोबर सामाजिक कार्यात देखील त्यांचे उत्तम योगदान असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अण्णासाहेब कटारे यांनी मागच्या काळात त्यांच्यावर ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती,
ठाणे जिल्ह्या मध्ये दिनेश ठाकरे यांनी केलेली उत्तम कामगिरी आणि ठाकरे यांच्या कडे असलेले संघटन कौशल्य याचा विचार करून आगामी होणाऱ्या निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर राज्याच्या कार्यकारिणी मध्ये बदल करुन दिनेश ठाकरे यांना संपुर्ण महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे, मुंबई मराठी पत्रकार भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अण्णासाहेब कटारे यांनी या नियुक्तीची घोषणा केली,
शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ऍड दिनेश ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून पक्षाला एक नवी दिशा देण्याबाबत संकल्पना मांडली,तर येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त ऊमेवार निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी आणि पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे दिनेश ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले,
या वेळी महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, ऊपस्थित सर्वच पदाधिकारी व राष्ट्रीय नेत्यांनी दिनेश ठाकरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर पक्षानी दिलेली जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडण्याचे आश्वासन दिनेश ठाकरे यांनी दिले, आता दिनेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रतील राजकारणात कशा प्रकारे बदल घडेल हे लवकरच पाहायला मिळणार आहे,