आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले, यांच्या हस्ते आमचा सन्मान झाला, हे आमचे भाग्यच आहे…..मा. पोलीस अधिकारी डी वाय एस पी-शिवाजीराव जमदाडे
प्रतिनिधी! पुणे! स्नेहा उत्तम मडावी

पुणे नायगाव .. या ठिकाणी एक पारधी समाजाची वस्ती आहे .. याच वस्तीवर मा . डिवाय एस .पी. जमदाडे व डॉ सुरेश राठोड यांनी भेट दिली !! ! ….. पारधी हा समाज परिवर्तनाच्या दिशेने किती वेगाने निघाला आहे … याचे टिपलेले क्षणचित्र …..
नायगाव …तुकाराम ज्ञानदेव भोसले यांचे घर गोकुळासारखे आहे. तेथे नेहमी आनंद बरसत राहतो. सुनिल चे आई वडील, भाऊ बहीण व वहिनी यांच्यातील प्रेम अनमोल आहे. कोट्यावधीचा पैसा असणाऱ्यां च्या घरी जो आनंद नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने साध्या घरात राहणाऱ्या सुनिलच्या घरी तो आनंद पाहायला मिळतो.सुनिल नागपूरला होते तरी पण तुकाराम भोसले यांनी आमचा पाहुणचार केला,
पहिल्यांदाच आम्ही पोलीस क्षेत्रातील माझी अधिकारी डी वाय एस पी, शिवाजीराव जमदाडे कोल्हापूर,महामंत्री हिंदू रक्षा समिती डॉ सुरेश राठोड न्यूज पेपर चे संपादक, सायंटिस्ट,प्रा.प्रतीक मुणगेकर मुंबई ट्रस्टी व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सुनिल यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो होतो. पण तिथला आनंद पाहून आम्हाला अत्यानंद झाला, त्यामुळे आमचे पाऊल त्यांच्या घराबाहेर न पडता एक वस्ती करून, जाण्यासच भाग पडले. सुनिल यांच्या दारात एका बाजूला लिंबाचे झाड व एका बाजूला आवळ्याचे झाड, नारळ, आंब्याचे झाड त्याबरोबर बांधलेली गाय, छोटस वासरू,, हे पाहिल्यानंतर आमचे लहानपण आठवले. त्यांच्या आई-वडिलांना पाहिल्यानंतर आम्हाला मामाच्या गावी आल्यासारखे वाटले. पुण्या मध्ये या नायगाव खूप सुंदर गाव आहे,
एक मुक्काम केल्यानंतर सकाळी आम्ही त्यांच्या घरातून कोल्हापूरला परत येत असताना. आरतीचे ताट घेऊन समजसेविका सुरेखा तुकाराम भोसले यांनी आरती ओवाळली, त्यावेळी आम्हाला बहिणी प्रमाणे केलेल्या मायेमुळे डोळे भरून आले. पत्रकार सुनिल यांचा पुतण्या, लहान बाळ अकरा वर्षचा ग्रीष्म अतिशय नटखट, हुशार व खेळाडू वृत्तीचा आहे. भविष्यात त्याच्यावरती ही असेच संस्कार देण्याचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबाकडे पाहून असे वाटले, की प्रत्येक घरातील आई वडील व कुटुंबियांनी मुलांवरती असे संस्कार व घरातील वातावरण अशा पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे. माजी अधिकारी डी वाय एस पी शिवाजीराव जमदाडे यांनी सर्वांचे आभार मानले व त्यांना लहानपणाचे बालपण आठवले
शेवराई ज्ञानदेव भोसले यांचा शाल श्रीफळं देऊन सत्कार केला शिवाजीराव जमदाडे साहेब यांचे तसेच महामंत्री रक्षा समितीचे डॉ सुरेश राठोड साहेब यांचा ही सत्कार केला शेवराई यांच्या हस्ते व कोल्हापूर काँग्रेस विभागीय समन्वयक सरदार पाटील यांचा सत्कार शेवराई भोसले यांच्या हस्ते झाला, मुंबई डॉ प्रतीक मुणगेकर साहेब यांचा सत्कार ज्ञानदेव भोसले यांनी केला, डॉ मेडी तामगावकर उप सरपंच यशवंत सातपुते या सगळ्याचे सत्कार करण्यात आले
उपस्थिती ज्ञानदेव शिलेदार भोसले, तुकाराम ज्ञानदेव भोसले, सुजाता ज्ञानदेव भोसले, राजश्री ज्ञानदेव भोसले, या नायगाव मध्ये पारधी समाजाच्या कुटूंबामध्ये खूप काही शिकायला मिळाले आणि तुकाराम भोसले यांच्या घरी मुक्कामाला राहण्याचा योग आला, ज्या पारधी समाजाला पोलीस त्रास देतात त्याच समाजातील कुटुंबाने एक दिवस सेवा केली हे मी कधीही विसरणार नाही आई शेवराई ज्ञानदेव भोसले यांचा खरोखर आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे,