ताज्या घडामोडी

बदलापूर! कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी नाकारली आमदारकीची पेन्शन

जुन्या पेन्शन बाबत राज्यभरात सुरू असलेल्या सरकारी कर्मचारी यांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी, आमदारकीची पेन्शन नाकारत असल्याचे पत्र विधानपरिषद सभापती यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे, नुकत्याच झालेल्या शिक्षक आमदार मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या असताना या निवडणुकीत बदलापुर शहरातील स्थानिक शिक्षक असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातुन विजय झालेला आहे, निवडणुकी पुर्वी शिक्षकांचा देखील जुनी पेन्शन सुरू करणे हा महत्त्वाचा मुद्दा होता या बाबत प्रचारा दरम्यान ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते, परंतु निवडणुका संपल्या आणि शिंदे फडणवीस सरकारने या मुद्याला जाणिव पुर्वक बगल देऊन मतदारांची फसवणूक केली असल्याचे बोलले जात आहे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी अनेक प्रयत्न करुन त्यांना न्याय देणाचा प्रयत्न केला आहे, या मध्ये जुन्या पेन्शन बाबत महत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आझाद मैदानावर देखील या बाबत वेळोवेळी आंदोलन करुन शासनाच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे,आज ज्ञानेश्वर म्हात्रे हे सरकार मध्ये असुनही सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नाही,ऊलट अर्थि आमदारांच्या पेन्शन मध्ये कशा वाढ करता येईल असा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकारचा सुरू आहे, त्या मुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी थेट विधानपरिषद सभापती यांना पत्र देऊन आपण आमदारकिची पेन्शन नाकारत असल्याचे कळवले आहे,सरकारी कर्मचा-यांच्या न्याय हक्कासाठी ईतरही आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सारखे धाडस करणार आहेत का कींवा शिंदे फडणवीस सरकार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पत्रा बाबत कोणता निर्णय घेते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.