सिद्धार्थ फाऊंडेशन संस्थेच्या एक वही एक पेन संकलन उपक्रमास समाजातून भरघोस प्रतिसाद

सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेच्या वतीने क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक वही एक पेन संकलन उपक्रमाचे आयोजन सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे अध्यक्ष अशोक रामचंद्र गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वेसर्कल वासिंद पश्चिम येथे 11 एप्रिल 2023 ते 14 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाले.
सदर उपक्रमात सर्व समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्वांनी सहभाग घेऊन शालेय लेखन साहित्य (वह्या पेन ) व इतर लेखन साहित्याचे सहकार्य तसेच आर्थिक सहकार्य करून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
एक वही एक पेन संकलन उपक्रमात सहभागी सर्व समाज बंधू भगिनींचे ” *असे आपले संविधान*” पुस्तक संस्थेच्या वतीने सप्रेम भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर एक वही एक पेन संकलन अशा स्तुत्य उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.
हे जमा झालेले शालेय लेखन साहित्य जून मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच शाळा शाळांमध्ये जाऊन जे गरीब, गरजू,वंचित घटकातील विद्यार्थी आहेत.अशा विद्यार्थ्यांनाच वाटप करणार आहोत,जेणे करून असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत.असे संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड व सरचिटणीस जगदिश गायकवाड यांनी सांगितले.
तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभागी आंबेडकरी अनुयायांना संस्थेच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड, सरचिटणीस जगदिश गायकवाड, खजिनदार होमराज शेंडे,कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.संतोष गायकवाड, उपाध्यक्ष बळीराम गायकवाड, उपाध्यक्ष शिवराम चन्ने,सह सरचिटणीस संजीव जाधव, सहसरचिटणी संदीप गायकवाड, सहखजिनदार जितेंद्र खरे,हिशोब तपासणीस सिद्धार्थ साळवे,संघटक मिलिंद गायकवाड, संचालक अशोक शंकर गायकवाड, माजी अध्यक्ष भास्कर गायकवाड, माजी अध्यक्ष वसंत धनगर, संचालक महादेव वाढविंदे,गुरूनाथ गायकवाड,भागवत चन्ने,मच्छिंद्र साळवे,प्रकाश गायकवाड, प्रकाश कांबळे,रत्नदीप शिवगण, औदुंबर गंगावणे,कैलास खैरनार, सुरेन्द्र शेवाळे,जगदिश सोष्टे,संदीप निकम, जिवन पंडीत यांनी विशेष परिश्रम घेतले.