पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ताकदीने आगामी निवडणुकीत उतरणार,,

पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र या पक्षाची राज्य कोअर कमिटी व प्रमुख पदाधिकारी यांची दि.18 जुन रोजी ठाणे शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.सदर बैठकीला 55 पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये पक्षिय राजकीय तेचे महत्वपुर्ण विषय हाताळण्यात आले.या विषयांमध्ये प्रामुख्याने येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकींमध्ये पक्षाची भुमिका कोणती असावी हे ठरवण्यात आले.या विषयी दोन पर्याय ठेवण्यात आलेले आहेत पहिला पर्याय म्हणजे कोणत्या तरी समविचारी पक्षासोबत मैत्री करणे.परंतु मैत्री ही राजकीय पद्धतीनुसारच असणार आहे अन्यथा रिपब्लिकन पक्षाला संगतीला घेतले जाते परंतु पंगती पासुन दुर ठेवले जाते असे चालणार नसुन जो पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे संविधानानुसार समता,सार्वभौमता,आणि धर्मनिरपेक्षतेने काम करत असेल अशाच पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला जाईल.अन्यथा स्वबळावर जेवढ्या जागा जमतील तेवढ्या लढवणार असा एकमुखी ठराव घेण्यात आला.आजपर्यंत रिपब्लिकन चळवळीची जी फरफट झालेली आहे तशास्वरुपाने कोणतेही वर्तन न करता.समाज परिवर्तन व व्यवस्था परिवर्तनासाठी स्वाभिमानाने अन्याया विरोधात संघर्ष करुन सर्व स्थरातील बंधू भगीनींना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.या कोअर कमिटीच्या बैठकीमध्येच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगडचे नेते आद.महेशजी साळूंखे हे उपस्थित राहिले आणि त्यांनी पक्षाच्या भुमिकेबद्दल बोलताना स्पष्ट केले की पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र या पक्षाचा जो निर्णय होईल त्या निर्णयाचा मान राखुन रायगड जिल्हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबतच राहिल आणि तुमच्या समवेतच यापुढे काम करण्यास आम्ही तयार आहोत असे सांगितले.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.पँथर मिलिंदभाई सुर्वे हे होते.बैठकीवर मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.मंगेशजी पगारे,राज्याचे उपाध्यक्ष मा.अशोकजी तांबे,मा.शशिकांतजी शिंदे,मा.भिमसेनजी जाधव तसेच ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष मा.रोहिदासजी वाघमारे,जिल्हा अध्यक्ष अनिलजी लगाडे,यांनी आपआपले मनोगत व्यक्त करताना पक्षाठामपणाची भुमिका ठरवावी असे कथित केले.उपस्थित मान्यवरांचे प्रश्न आणि शंका यांचे निरसन पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव प्रा.डॉ.उमेश पवार यांनी सर्व प्रश्नांचे निरसन करुन आपण घ्यावयाची भुमिका ही सर्वांच्याच कल्याणाची आणि चळवळीला गतिमान करणारी असणार आहे असे स्पष्ट करुन जुलै महिन्यामध्ये आपण जी भुमिका घेणार ती स्पष्ट केली जाईल असे सांगितले.अध्यक्षिय भाषणामध्ये मा.अध्यक्ष यांनी पक्ष मनमानी आणि स्वार्थाने काम करणारा नसून सर्वसमावेशक पद्धतीने काम केले जाईल तसेच मनमानीला थारा दिला जाणार नाही आणि योग्य त्याच प्रकारे सर्वांना सोबत घेऊन जाणारा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.बैठक संपवतानाच पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.मोहनजी बोदाडे यांचा वाढदिवस होता तो वाढदिवस सर्वांसमवेत साजरा करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.बैठकीला मुंबई प्रदेश महासचिव मा.अस्लमजी शेख,तुकारामजी हेगडे,चंद्रकांत रुपेकर,माणिकजी शिंदे,माधवजी कट्टार,सुफियानजी चौघुले,तसेच अनेक पदाधिकरी यांनी बैठकीला उपस्थित राहुन चर्चेमध्ये सहभाग घेवुन बैठकीची सांगता झाली.