
महाराष्ट्रातील शिवसेने प्रमाणे भाजपा आमच्या पक्षात देखील फुट पाडत असल्याचा आरोप करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजपा बरोबर स्थापन केलेले सरकार कोसळवले, बिहार मध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार असताना भाजपाने जनतादला बरोबर युती करून नितिश कुमार यांना मुख्यमंत्री पदावर बसवले होते, परंतु भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात शिवसेनेचा जो खेळ खंडोबा केला त्याचे पडसाद देशभरात बघायला मिळाले आणि नितिश कुमार यांच्या भाजपाच हे कुटील कारस्थान वेळीच लक्षात आले, महाराष्ट्रातील शिवसेने सारखी जनता दलाची अवस्था होऊ नये हे वेळीच लक्षात आल्याने नितिश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन भाजपाचा डाव उधळून लावला अस म्हणायला काहीच हरकत नाही, महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार गेल्या पासून भाजपा चवताळून उठली आहे,सत्ता हस्तगत करण्यासाठी “कायपण” या युक्तिने शिवसेनेच्या आमदारांना साम दाम दंडाचा वापर करत फोडले,सावज टिपण्यासाठी जसे जंगली जनावरे एक एक पाऊल मागे टाकून नंतर सावज टप्प्यात आले की मग हल्ला करत तशीच निती भाजपाची आहे, महाराष्ट्रात शिंदे गटाची अवस्था अशिच होणार आहे,आपले १०६ आमदार असताना ४० आमदार असलेल्या शिंदे गटाला मुख्यमंत्री पद देणे म्हणजे भाजपाने शिकार टिपण्यासाठी मागे टाकलेले पाऊल आहे हे एकनाथ शिंदे यांच्या का लक्षात येत नाही? भाजपाने टाकलेला डाव जेव्हा एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी वेळीच ओळखून स्वतःच अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा घर का ना घाट का अशी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही,