( ३ मार्च २०२३) वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्ह्याची धगधगती तोफ,, दत्ता गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अनंत शुभेच्छा,,,

बदलापूर! बदलापूर शहरांतील वंचित बहुजन आघाडीची धगधगती तोफ म्हणून ओळखले जाणारे श्री दत्ता गायकवाड यांचा आज ३ मार्च २०२३ रोजी वाढदिवस,,
गेले अनेक काळा पासून आंबेडकरी चळवळीत आग्रही भूमिका घेऊन सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे नेते म्हणून दत्ता गायकवाड यांची ओळख आहे, बदलापुर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणजे दत्ता गायकवाड आणि दत्ता गायकवाड म्हणजे वंचित बहुजन आघाडी असे समिकरण झाले आहे
, सर्वच शासकीय प्रशासनावर आपली भक्कम पकड निर्माण करून अडणीत सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याच काम दत्ता गायकवाड हे सातत्याने करत असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो,
दत्ता गायकवाड करीत असलेल्या सामाजिक राजकीय चळवळींची दखल नेहमीच वरिष्ठ पातळीवर घेतली जात असल्याने, काही महिन्यांपूर्वी त्यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करुन त्यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे, दत्ता गायकवाड हे सातत्याने कधी पालिका प्रशासनाच्या विरोधात तर पोलिस प्रशासन तर कधी तहसील कार्यालय तर कधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवुन वेळ पडल्यास जन आंदोलन उभारुन सामान्य जनतेला नेहमीच सर्वोतोपरी न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात,
त्यांचा वाढता जनाधार हा येत्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करून देईल अशी चर्चा बदलापुर शहर तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात होताना दिसत आहे,
लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने श्री दत्ता गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अनंत शुभेच्छा