आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्या अटके बाबत नऊ विरोधी पक्षनेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र,,,

आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांना दिनांक २६ फेब्रुवारी रोजी कोणतेही ठोस पुरावे नसताना दिल्ली मध्ये अटक करण्यात आली आहे, या मुळे पुन्हा एकदा केंद्रीय यत्रंणाचा गैरवापर करत राजकीय षडयंत्र भारतीय जनता पक्षाने रचले असण्याचा आरोप देशभरातील विविध राजकीय संघटनांनी केला आहे,विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार,आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल,बि आर एस चे चंद्रशेखर राव, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव,जेकेएनसी चे फारुख अब्दुल्ला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एसपी कडून अखिलेश यादव यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या बाबत पत्र लिहून या बाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे, भारत हा लोकशाही प्रधान देश असून विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा ज्या प्रकारे गैरवापर सुरू आहे त्या वरून हा देश लोकशाही कडून हुकुमशाही कडे चालला असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे, भाजपाच्या राजवटीत भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे पत्रता नमुद करण्यात आले आहे,आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी शालेय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्या मुळे सिसोदिया यांच्यावर झालेल्या कारवाई मुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे,