ताज्या घडामोडी
पुण्यामध्ये बोगस मतदार यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भिम आर्मी पक्षाची मागणी,,,,

पुणे! पुणे महापालिका हद्दीतील वार्ड क्रमांक ६ अनुक्रमांक एकुण २४६ ते ८८९ अशी बोगस नावे नोंद केली असल्याचा आरोप भिम आर्मी पक्षाने केला आहे,सदरची नावे ही कोणत्या हेतूने आणि कोणाच्या फायद्यासाठी या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत,याची चौकशी होणे आवश्यक आहे, या बाबत भिम आर्मी पक्षाच्या वतीने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे सि ई ओ यांंना निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे,जो पर्यंत या सर्व प्रकाराची चौकशी होऊन कारवाई न केल्यास बोर्ड ऑफिस समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भिम आर्मी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे,