महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे…..* *भीमराव आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार,,
महादू पवार* पत्रकार मुंबई 9867906135

मुंबई!!, बिहार मधील ऐतिहासिक प्राचीन महाबोधी विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळालेच पाहिजे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय सचिव महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्याबाबत लवकरच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार असल्याची माहिती भिकाजी कांबळे यांनी दिली आहे.
भारत सरकारच्या 1950 च्या कायद्यामध्ये बदल करण्यात यावा, त्यासाठी बुद्धगया महाबोधीविहार मुक्तीसाठी महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर आंदोलन केले जात आहे. महाबोधी महाविहार या ठिकाणी ट्रस्टमध्ये चार बौद्ध आणि पाच हिंदू हे ट्रस्टी आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असून गौतम बुद्धाने जगामध्ये मानवतेचा संदेश दिला. मुस्लिम समाजाची पवित्र मक्कामध्ये कधी हिंदूआहेत का ?ख्रिश्चन समाजामध्ये हिंदू शिख धर्मियांमध्ये हिंदू आहेत का? परंतु बौद्धांच्या महाबोधी विहारमध्ये हिंदू का असू शकतात ? असा सवाल भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे यांनी थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. जगभरातील बौद्ध धम्मीयांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बौद्ध महासभा हा लढा लढणार आहे, त्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती भिकाजी कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.