क्रांती रत्न , लोक शाहीर , विद्रोही लेखक , कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंती निमित्ताने,,,,,,!
ऍड अविनाश टी काले , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर मो क्र 9960178213

मी नुकतेच सोलापूर लॉ कॉलेज ला ऍडमिशन घेतले होते , 12वी नंतर प्रि लॉ चां 5वर्षाचा तो अभासक्रम होता
सोलापूर हे कामगार चळवळीचे केंद्र असल्याने मार्क्स वादी चळवळीचे लाल बावटा चे कार्यालय सोलापूर येथे जोरात होते , कॉम्रेड ए ए मुजावर हे त्याचे कार्यालयीन प्रमुख व नेते होते आणि चळवळीच्या निमित्ताने दक्षिण सदर बझार येथील कार्यालयात मी जात असे , तेथेच अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची ओळख झाली , आणि युवा अवस्थेतील तरुण रक्ताचा कार्यकर्ता या नात्याने झपाटून त्यांची पुस्तके विविध साहित्य वाचू लागलो
मी अण्णा भाऊ यांच्या प्रेमातच पडलो आणि तेच माझा आदर्श ही बनले
अण्णा भाऊ यांचा जीवन प्रवास हा खडतर असणे ही बाब साहजिक आहे , ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला , सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे वाळवा तालुक्यातील गाव , तसे पाहिले तर सांगली ,सातारा याच भागातील लोक हे स्वांतत्र्य चळवळ असो किंवा आणखीन कोणत्याही राजकीय क्रांतिकारी लढाया असोत यात इतिहास काळापासून अग्रेसर आहेत , छत्रपती शिवरायांच्या दोन्ही गाद्या या सातारा व कोल्हापूर या भागातच आहेत , या विभागाला निसर्गाने भरभरून दिले , बारमाही वाहणाऱ्या नद्या दिल्या , डोंगर रांगा दिल्या परंतु या ही पेक्षा पोलादी मनगट असलेली पोलादी छातीची माणसे ही दिली , ज्यांची नामावली लिहीत राहिलो तरी एखादे दुसरे राहून ही जाईल , तरीही अलीकडील क्रांती सिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नाईकवडी, , वसंत दादा पाटील , जी डी तथा बापू साहेब लाड , डॉ भारत पाटणकर , आर आर आबा, गोविंदराव पानसरे , बापू बिरू वाटेगावकर आदी
तत्कालीन ग्रामीण जीवन हे शेतीवर आधारित जीवन असल्याने उत्पंनाच्या मर्यादा या असतं च , कधी कधी तीव्र स्वरूपाचा दुष्काळ ही पडत असे आणि माणसा सहित जनावरांचे ही हाल होत असत
भारतीय जाती व्यवस्थेने दलीत जाती ना अस्पृश्य ठरवून त्यांना युगानुयुगे कठोर अशी शिक्षा दिली आहे , ना शिक्षण ना स्वतः चे मालकी हक्काची जमीन , मग उत्पंनच नसेल तर घरे दारे तरी कशाने बांधावीत? त्यात ही गावाचे बाहेर या वस्त्या ठेवल्याने या वस्त्यात सुविधांचा अभाव ही तितकाच असे , रस्ते निवडुंग बेटानी झाकलेले , आणि रात्र झाली की झोपड्यातील दिवे ही विझवून या वस्त्या अंधारले जीवन जगत , जणू त्यांच्या जीवनात फक्त अंधार आणि अंधारच निर्मिलेला आहे
अशा गावात 1 ऑगस्ट 1920 साली अण्णा भाऊचा जन्म झाला , पोरसवदा वयात शाळेत घातलं तर तिथं ही मास्तरांनी लांब कोपऱ्यात बसवलं , अशक्त आणि द्रविडी मूलनिवासी काळेपन लेले ले अण्णा भाऊ त्यांच्या सौंदर्य शास्त्रात बसत च नसल्याने ते शिकले काय आणि ना शिकले काय ?या सनातनी वर्ण द्वेष व जाती द्वेष भावनेने पछाडलेल्या शिक्षकांनी त्यांना दुसऱ्याच दिवशी छडी फेकून मारली ,
पण स्वाभिमानी असलेल्या या कोवळ्या जीवाने तीच छडी त्या शिक्षकाला उलटून मारत धूम ठोकली
अर्थात शाळा अर्ध्यावर अक्षराची तोंड ओळख ही न होता सुटली , आणि त्याचे परिणाम म्हणून अण्णा भाऊ श्रमिक बनले ,
जगण्यासाठी मजुरी आणि अंग मेहनत करणे हाच पर्याय त्यांचे पुढे राहिला ,
गावात मजुरीचे पर्याय ही मर्यादित असल्याने , युवक असताना त्यांनी मुबईची वाट धरली , शहरात किमान काम मिळेल हा त्यांचा आशा वाद फोल ठरला आणि कायम कामगार बनण्याचे त्यांचे स्वप्न ही भंगले ,
ते बदली कामगार म्हणून मिल मधे जाऊ लागले , चिरा नगरच्या झोपड पट्टीत राहणे , आणि बदली कामगार म्हणून मिळेल ते काम करणे हेच जीवन चालू राहिले
याच कालावधीत महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत होत्या , मुबईतील कामगार चळवळी जोरात होत्या , कामगारांच्या हक्कासाठी ते लढत होते , सर्व जाती धर्माचे अडथळे पार करून लोक आपल्या हक्का साठी एकत्रित येत होते ,
स्वातंत्र्य चळवळीने जोर धरलेला होता तर दलितांच्या उत्थानाचां लढा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढला जात होता
अण्णा भाऊ अश्याच लाल बावटा कला पथकात सामील झाले , क्रांतिकारी पोवाडे गावेत , शाहीर अमर शेख , यांच्या कला पथकाला साथ देत त्यांनी कामगार लढे आणि अगदी महाराष्ट्र एकीकरण समिती चां लढा यात ही भाग घेतला ,
अण्णा भाऊ यांना जीवनाच्या शाळेतील शिक्षण मिळाले , पाठीवरच्या परिस्थिती चे वळाने त्यांना शिकवलं , बोर्डावरील एक एक शब्द बघून ते लिपी शिकले
आणि सारस्वतांच्या कानशिलात
लगावतील इतकी भाषा समृध्दी त्यांनी आत्मसात केली
अण्णा भाऊचे चे साहित्य हे करमणुकीचे साधन नाही , तर त्यांच्या साहित्यात परिवर्तनाचा , मार्क्स वादाच्या तत्वज्ञानाचा आशय ठासून ठासून भरलेला आहे
अण्णा भाऊ हे या अर्थाने या देशातील वर्गीय जातीय समीकरण याची मांडणी करणारे तत्ववेत्ता आहेत हे मान्य न करणारा समाज आणि चळवळी खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे दोषी आहेत
पोथी निष्ठ मार्क्स वाद्यांना अण्णा भाऊ कधी समजले नाहीत आणि उत्सवात दंग असलेल्या समाजाला ही ते कधी समजणार ही नाहीत
जगात फक्त कारखाना दार , भांडवलदार असा एक शोषक वर्ग असून तो वर्ग कामगाराच्या श्रमाचे शोषण करून वरकड मुल्या आधारे आपली संपत्ती निर्माण करतो , याने आर्थिक विषमता वाढते , आपल्या संपत्ती चे रक्षण करावे या हेतूने शोषक वर्ग धर्म , राष्ट्र , पोलीस , सैनिक , न्यायालये अशी व्यवस्था निर्माण करतात , आणि हे शोषण अखंडित पने चालूच ठेवतात
“जगातील कामगार एक झाले तर ते ही व्यवस्था उलथून टाकतील आणि वर्गभेद मिटवून समानतेच्या पायावर समाज निर्मिती करतील अशी त्यांची सर्वसाधारण धारणा होती
भारतातील प्रचलित जाती व्यवस्था ही धर्माने निर्माण केलेली व श्रम विभाजन जात व्यवस्थेने बंदिस्त केल्याने भंगी काम करणारा वाल्मिकी समाज वंश परंपरेने फक्त भंगी काम करण्यास बाध्य असतो व त्यास या घृणास्पद कामामुळे कधीच उच्च स्वरूपाचा सामाजिक , राजकीय आणि आर्थिक ही दर्जा प्राप्त होत नाही हे भीषण वास्तव जाती व्यवस्थेचे आहे ,, कितीही समरसता आणली तरी पुरोहित , क्षत्रीय , वैश्य वर्णीय लोक एस सी वर्गीय लोकांवर परंपरेने लादलेल काम कधीच करत नाहीत व करणार ही नाहीत
म्हणून इथे कामगारांच्या ही जाती ठरलेल्या आहेत , व ही श्रेणी बद्ध रचना फक्त आर्थिक प्रगती ने उध्वस्त होऊन जात नाही हे वास्तव अण्णा भाऊ यांनी अनुभवातून जाणले
जग बदल घालुनी घाव |मज सांगून गेले भीमराव||
गुलाम गिरीच्या या चिखलात | रुतून बसला का ऐरावत |
अंग झाडूनी निघ बाहेरी| घे बिनी वरती धाव||
धनवंतांनी अखंड पिळले|धर्मांधांनी तसेच छळले||
मगराने जणू माणिक गिळले| चोर जाहले साव||
ठरवून आम्हा हिन कलंकित| जन्मो जन्मी करुनी अंकित|
जिणे लादून वर अवमानित| निर्मून हा भेदभाव||
एकजुटीच्या या रथावरती | आरूढ होऊन चल बा पुढती||
या एका गिताचे नीट वाचन केले तरी अण्णा भाऊ समजतात , पण ते कुणाला समजूनच घ्यायचे नसतील तर त्याला कोण काय करणार ?
आंबुज भारी का भोकुर भारी?यातच साऱ्या दलितातील बहुसंख्य असलेल्या महार आणि मातंग समाजाची जिरली आहे हे कधी त्यांच्या लक्षात येणार ?
वायलट्या दुतवता दूतवता यांची मती मातीत गेली आहे,
या समाजातील लोकप्रतिनिधी चां टक्का ही राजकारणातून कमी होत आहे ,
आपल्या हक्का प्रति जागरूक असलेल्या व चळवळीची भाषा बोलणाऱ्या नव बौद्ध समाजाला प्रस्थापित समाजाने प्रतिनिधित्व नाकरण्यास सुरुवात करत , त्याची रीप्लेसमेंट म्हणून मातंग समाजाला प्रतिनिधित्व कांहीं काळ दिले , परंतु हा समाज ही जसा संघटित होऊ लागला व अन्याय अत्याचारा विरोधात लढू लागला तसतसा या ही समाजाचा राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी चां टक्का ही घसरू लागला आहे हे आजूबाजूला पाहिले तरी लक्षात येते
अगदी फलटण हा विधान सभे साठी राखीव झाल्या पासून इथे आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस ने ही या दोन्ही समाजाला उमेदवारी दिली नाही
माळशिरस विधानसभा तीन टर्म होऊन ही या दोन्ही समाजाला जागा मिळालेली नाही , तर मोहोळ मतदार संघात ही या दोन्ही समाजा पैकी एक ही जण त्यांना निष्ठावंत वाटला नाही , रमेश कदम यांचा अपवाद वगळता इथे ही त्या काळी अनुसूचित जाती त नसलेल्या यशवंत माने यांना ही उमेदवारी दिली गेली
आम्ही हेच कमी अधिक फरकाने सर्वत्र हेच पाहत आहोत
पण तो आपला विषय नाही ,
अण्णा भाऊ म्हणत “मला कल्पनेचे पंख लाऊन आकाशात भरारी मारणे आवडत नाही , आणि माणसांचे विद्रुपीकरण ही आवडत नाही
मला रडत खुरडत जगणारी माणसे आवडत नाहीत मला लढणारी माणसे आवडतात
अण्णा भाऊचे नायक हे पर्वताला भुईसपाट करण्याचे सामर्थ्य राखतात , ते अन्याय अत्याचारा विरोधात शस्त्र देखील उचलतात पण ते आपली नैतिकता गमावत नाहीत , कुणाच्या लेकी बाळींची अब्रू लुटत नाहीत , मिळालेली लूट ते एकटे खात नाहीत तर समग्र शोषित समाजात समानतेने वाटप करतात ,
मंगला नावाच्या कादंबरी त , गणू आणि पाटील अशी दोन पात्र आहेत , व त्यांचे त एक संवाद आहे
जो मला अतिशय भावतो
, गावाच्या बाहेरून मसनवट्या तून जात असताना , अपुऱ्या चितेत अर्धवट जळाले ले प्रेत त्यांना दिसते , ते जवळ जातात , त्या प्रेताला आत ढकलतात आजू बाजूची लाकडे टाकून पेटवतात व पुढे चालत जात असताना खिन्न अवस्थेत असलेला गणू विचारतो
व्हय पाटील अस कस एखाद्याच नशीब असल माणसाचं की ज्याला जाळण्यासाठी लाकड ही भरपूर मिळू नयेत?
पाटील गणू ला म्हणतात
“गणू , “जगात दोन प्रकारची माणसे असतात”
एक स्वतःचे पोट दुसऱ्याच्या पाठीवर लादून जगणारे ऐतखाऊ
दुसरे आपले स्वतः चे पोट व दुसऱ्याचे ही पोट आपल्या पाठीवर लादून जगणारे सर्वसामान्य
पण पाहिला चंदनाच्या चितेत जळतो
तर दुसरा अपुऱ्या चितेत
माझ्या हातात खुरप आणि दोरी होती तोवर सावकारान शेतावर बोजा चढवला , हातातलं खुरप आणि दोर टाकून दिला व हातात बंदूक घेतली तवाच सावकारान ते कर्जा च दस्त
टराटरा फाडले आणि माझी जमीन मला दिली!
सर्वसामान्य माणस सन्मानाने जगली पाहिजेत , त्यांच्या विकासाचे दरवाजे उघडले गेले पाहिजेत , त्यांचा जमीन , जंगल, पाणी , आणि हवा यावर ही तितकाच हक्क आहे जितका उच्च वर्नियां चां आहे हे मान्य करणारी व्यवस्था या देशात अजून ही निर्माण झालेली नाही , शिक्षणाचे खाजगीकरण, उद्योगाचे खाजगीकरण , आरोग्य सेवेचे खाजगीकरण , सार्वजनिक सेवा चे खाजगीकरण , झपाट्याने होत आहे , बँका ही खाजगी होत आहेत
भांडवलदार व सत्ता धीश वर्गाचा उकरंडा ही दलितांच्या सुबत्ता पेक्षा सधन असतो इतकी पराकोटीची विषमता आज देशात आहे
22कोटी लोकांना एक वेळचे जेवण मिळत नाही आणि हाताला काम नाही इतके भीषण वास्तव असताना , राष्ट्र भक्ती आणि स्वातंत्र्या चे पोवाडे कसे गाऊ वाटतील?
ये आझादि झुठी है !देश की जनता भुकी है!
म्हणणारे अण्णा भाऊ आम्हाला आजच्या व्यवस्थेत कुठेच दिसत नाहीत
चिरा नगर चे झोपडीत राहून ही व्यवस्थेला शरण न जाणारे अण्णा भाऊ , सर्व शक्तिमान पंतप्रधानांच्या ही पुढे न झुकणारे अण्णा भाऊ , रशियात ज्यांचे आज ही स्मारक उभे केले जाते ते अण्णा भाऊ
13लोकनाट्य, ,3नाटके ,
13 कथासंग्रह,35कादंबऱ्या,1शाहिरी पुस्तक,1प्रवास वर्ण,15पोवाडे,7चित्रपट कथा लिहिणारे अण्णा भाऊ एका लेखात च काय , पुस्तकात ही मावणार नाहीत फक्त ते आसपास कुठे आहेत का?हे मी आज ही माणसाच्या गर्दीत शोधत राहतो
व्यवस्थेचे गुलाम झालेले मुर्दाड माणसे मला माझ्या सह आजूबाजूला दिसतात
पण क्रांती ची मशाल हाती दिलेला माझा अण्णा भाऊ मला कुठेच दिसत नाही आणि गवसत ही नाही !
अश्या माझ्या अण्णा भाऊ ना माझा क्रांतिकारी लाल सलाम!