विज वितरण कंपनी अदानी इलेक्ट्रीकल कंपनीला देण्याच्या विरोधात अधिकारी कर्मचारी अभियंता यांच्या संपाला सुरवात,, संप चिघळण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अदानी ईलेक्ट्रीक कंपनी कडे हस्तांतरित करण्याच्या शासन निर्णया विरोधात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक ३ जानेवारी २०२३ पासून ७२ तासांच्या संपावर जाणार आहेत, महाराष्ट्र राज्य वीज अधिकारी कर्मचारी अभियंता संघर्ष समिती तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विज कर्मचारी अभियंता संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला या बाबत निवेदन सादर केलेले आहे, येत्या ७२ तासात राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही तर हा संप बेमुदत सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या विज वितरण कंपनी ही आर्थिक फायद्यात चाललेली असताना किंवा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे काम सुरळीत चालू असताना शासनाने अदानी ईलेक्ट्रीक कंपनीला ही कंपनी हस्तांतरित करण्याची गरज काय असा प्रश्न कर्मचारी आणि अधिकारी व अभियंते यांनी उपस्थित केला आहे,विज वितरण कंपनी जर अदानी ईलेक्ट्रीक कंपनीकडे दिली तर अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या कर्मचारी आणि अभियंते यांना नोकरी मधुन काढून टाकले जाण्याची शक्यता विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे,विज वितरण कंपनी ही सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक फायद्यात असताना शासनाने हा कोणाच्या फायद्यासाठी घेतला आहे,असा सवाल आता विविध माध्यमातून उपस्थित झाला आहे,
महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळातील कार्यक्षेत्रा मध्ये अदानी इलेक्ट्रीकल कंपनीने वितरणाचा विद्युत नियामक आयोगाकडे सांगीतलेल्या परवाण्याच्या अनुषंगाने विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून शासनाच्या या धोरणाला विरोध करत आंदोलनाची भूमिका घेत बेमुदत संपाची हाक दिली आहे, या मुळे दिनांक ३ जानेवारी २०२३ रात्री बारा वाजता विज कर्मचारी ७२ तासांसाठी संपावर जाणार आहेत,