साडेसात लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तिघांना अटक, नाशिक शहर ग्रामीण पोलिसांची कामगिरी*
प्रतिनिधी! शांताराम दुनबळे

नाशिक-: शहर-ग्रामीण लक्षपोलिसांकडून सातत्याने प्रतिबंधित पानमसाला आणि गुटख्याविरोधात कारवाई केली जात असतानाही शहरात चोरीछुप्या प्रतिबंधित गुटख्याची सर्रासपणे विक्रीसाठी साठा केला जातो आहे.यासंदर्भात पंचवटीतील कुमावतनगरमधील एका गोदामावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून सुमारे साडेसात लाखांची प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तसेच, तिघा संशयितांना जेरबंद केले आहे.रवींद्र जगन्नाथ ब्राह्मणकर उर्फ रवी (४२, रा. मोरया अपार्टमेंट, मखमलाबाद रोड) या मुख्य संशयितासह विकास वाल्मिन भारस्कर (३३, रा. देव अमृत सोसायटी, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका), सचिन रमेश कोठावदे (३८, रा. विघ्नहर्ता रो हाऊस, पेठरोड) अशी संशयितांची नावे आहेत.शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी मध्यरात्री सुगंधित पानमसाला व तंबाखू असलेल्या कुमावत नगरमधील गोदामावर छापा मारला. शहराच्या विविध भागात संशयित ब्राह्मणकर हा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची विक्री करीत असल्याची खबर अंमल पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पथकाचे वरिष्ठ निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी सापळा रचण्याचे आदेश देत, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार देवकिसन गायक, संजय ताजणे, गणेश भामरे,बळवंत कोल्हे, नितीन भालेराव, रवींद्र दिघे, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे, योगेश सानप, गणेश वडजे, अविनाश फुलपगारे आणि महिला अंमलदार अर्चना भड यांनी रात्री परिसरात तळ ठोकत कारवाई केली. याप्रकरणी तिघा संशतियांविरोधात पंचवटी पोलिसांत अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.संशयित ब्राह्मणकर,भारस्कर यांच्याकडून ६ लाख २७ हजार ८२२ रूपयांचा तर संशयित कोठावदे याच्या ताब्यातून १ लाख १७ हजारांचा असा ७ लाख ४४ हजार ९३२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.
तसेच, गुटख्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहनही पोलीसांनी जप्त केली आहेत.वरिल कारवाई पोलिस अंमलदार यांना मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार करण्यात आली.तसेच पोलिस प्रशासनातर्फे बाळासाहेब नांद्रे यांनी फिर्याद दिली.