ताज्या घडामोडी

बदलापूर !! राहटोली ग्रामपंचायत उपसरपंच चेतन बनकर यांना तात्पुरता दिलासा,,जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश,,

चेतन बनकर पुन्हा एकदा उपसरपंच पदि विराजमान

बदलापूर !! कुळगाव बदलापुर शहराला लागूनच असलेल्या राहटोली ग्रामपंचायत उपसरपंच चेतन बनकर यांच्यावर आणलेल्या अविश्वास ठरावाला मा, जिल्हाधिकारी यांनी स्थगीती दिली आहे, अंबरनाथ तालुक्यातील वादग्रस्त ग्रामपंचायत म्हणून राहटोली ग्रामपंचायत ओळखली जाते, या ग्रामपंचायत पंचायत मध्ये सातत्याने सदस्यां मधिल आपसातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यातच या ग्रामपंचायत सदस्यांचा वेळ चालला आहे असे म्हणायला हरकत नाही,

मागील काळात याच ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ साक्षी करंदुले यांनी उपसरपंच चेतन बनकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा बदलापुर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे,तर याच ग्रामपंचायतीच्या एक सदस्या सुरेखा वाघ यांनी सरपंच सौ साक्षी करंदुले यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा अंतर्गत बदलापुर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे,ही दोन्ही प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहेत, परंतु या दोन्ही प्रकरणावरून ग्रामपंचायत मध्ये सातत्याने वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, ग्रामपंचायत मध्ये एकुण सहा सदस्य हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर तिन सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, या मुळे सरपंच आणि उपसरपंच हे दोन्ही शिवसेना पक्षाचे आहेत, परंतु उपसरपंच पदा बाबत याच शिवसेनेच्या सदस्यांमध्ये वाद सुरू झाला असुन, चेतन बनकर यांना हटवून नवीन सदस्यांला संधी मीळण्यासाठी चेतन बनकर यांना उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू केला असल्याचे समजते, परंतु उपसरपंच चेतन बनकर यांनी राजीनामा दिला नसल्याने त्यांच्यावर विविध आरोप करत शिवसेना सदस्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिन सदस्यांना हाताशी धरून चेतन बनकर यांच्यावर अविश्वास ठराव पारित केला होता, दिनांक १६ मे २०२३ रोजी ग्रामपंचायत मध्ये सात विरुद्ध दोन असा अविश्वास ठराव पारित करून मा तहसीलदार यांना सादर करण्यात आला असता दिनांक १९ मे २०२३ रोजी राहटोली ग्रामपंचायत कार्यालयात मा, तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करुन या सभे मध्ये मा, तहसीलदार यांनी सदस्यांनी घेतलेल्या ठरावावर शिक्कामोर्तब करुन चेतन बनकर यांना पायउतार केले होते,चेतन बनकर यांनी मा तहसीलदार यांच्या याच आदेशाच्या विरोधात अपर जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कडे अपिल सादर करुन चेतन बनकर यांच्या बाजूने ॶॅड प्रशांत रजपूत यांनी बाजू मांडली असता मा,अपर जिल्हाधिकारी यांनी चेतन बनकर यांना तात्पुरता दिलासा असुन जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश पारित केलेले आहेत, या प्रकरणी पुढील सुनावणी दिनांक ५ जुन २०२३ रोजी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे,आता पुढे या सुनावणीत न्यायालय कुठला निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे परंतु उपसरपंच पदावर पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.