शेई विभाग हायस्कुल शेई विद्यालयात 10 वीच्या बॅच चे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न,,

शेई विभाग हायस्कुल शेई, ता. शहापूर जिल्हा -ठाणे या माध्यमिक विद्यालतील सन 2003च्या इ.10 वीच्या बॅच चे स्नेहसंमेलन आयोजन करण्यात आले
स्नेह संमेलनच्या निमित्ताने सन 2003च्या इ.10 वी बॅचचे सर्व विद्यार्थी सकाळपासून शाळेत उपस्थित झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलकरून सर्व शिक्षकांचा शाल, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच शाळेसाठी विद्यार्थांकडून साउंड सिस्टीम बॉक्स भेट देण्यात आली. तसेच शाळेसाठी काही मदत लागल्यास आम्ही सढळ हस्ते मदत करू असे मनोगतात जाहीर केले. सर्व माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आपापला परिचय करून दिला.आणि या शाळेमुळेच आणि शिक्षकांनी केलेल्या उत्तम संस्कारामुळेच आमची प्रगती झाली असे ऋण व्यक्त केले. सर्व माजी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी आपापले मनोगत व्यक्त आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व आजी माजी शिक्षक आणि सर्व माजी विद्यार्थी सर्वांनी एकत्र सहभोजन केले
हा कार्यक्रम शालेय समितीचे चेअरमन माननीय जगन्नाथ हरी तारमळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे व्हाईस चेअरमन राम महाराज तारमळे,माजी मुख्याध्यापक श्री बच्छाव सर, देवकाते सर शेटे सर, लच्याने सर के. एम. तारमळे सर आणि कदम सर तसेच विद्यमान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उत्तम आव्हाड सर,जेष्ठ शिक्षक व्ही.डी.धनगर सर, एम टी सुरोसे सर, शंभूराव सोनवणे सर,आणि तसेच सुनील निचिते सर,विजय पवार सर गणेश आंधळे सर, योगेश तारमळे सर, सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी श्री हरिभाऊ भोईर तसेच शिक्षकेतर कर्मचारी राजाराम तारमळे, कोंडीबा माने, अशोक रेरा हे सर्व उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही डी धनगर सर, सुनील निचिते सर आणि या बॅचचा माजी विद्यार्थी आणि नांदकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ गायकर यांनी केले