भाजपा सरकार करत असलेल्या लोकशाही विरोधी कृत्याचा लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध,.
चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरणी पत्रकारांना दोषी धरणे म्हणजे लोकशाही विरोधी कृती,_,, प्रदीप गोविंद रोकडे-अध्यक्ष लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य.

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध राज्यभरात ठिकठिकाणी होत आहे, चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागुन शाळा सुरू केल्या असे वक्तव्य केल्याने राज्यासह देशभरात त्यांच्या या वक्तव्याचे तिव्र पडसाद उमटले, संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी संघटनांनी चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे, राज्यातील विविध सामाजिक राजकीय संस्था संघटनांनी चंद्रकांत पाटीलांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे,काल पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आले असताना एका संतप्त भिम सैनीकानी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करुन निषेध नोंदवला, राज्यातील सर्वच आंबेडकरी संघटनांनी या शाई फेकीच समर्थन केलेल आहे,पण सध्या हे शाई फेक प्रकरण आता जास्तच चिघळल असल्याच चित्र निर्माण झाल आहे,शाई फेक प्रकरणी शाई फेकणाऱ्या या भिम सैनीकावर पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
परंतु गुन्हा दाखल करताना जी कलम् लावण्यात आली आहेत त्या वरुन भारतीय जनता पक्षाची खुनशी वृत्ती आता समोर आली आहे, या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी शाई फेक करणाऱ्या भिम सैनीकावर भादवी ३०७, ३५३ आणि ईतर गंभीर स्वरूपाची कलम् लावल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे,कलम ३०७ हे खुनाचा प्रयत्न करणे या साठी लावला जातो तर कलम ३५३ हा सरकारी कामात अडथळा निर्माण करणेसाठी लावला जातो,असे असताना सत्तेचा गैरवापर करून पोलिस प्रशासनावर प्रचंड दबाव आणून अशा प्रकारची चुकीची कलम् लावुन थेट लोकशाहीचा गळा घोटण्याच काम भाजपा सरकारन केल आहे,त्या नंतर भाजपा सरकारने चंद्रकांत पाटीलांना खुष करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या अकरा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित केले आहे, हा लोकशाहीवर घातलेला दुसरा घाला आहे, त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शाई फेकीच समर्थन करत बक्षिसाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १४ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर बारामती मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,हा लोकशाही चिरडण्याचा अजुन एक प्रकार आहे, त्या नंतर आता शाई फेकीच चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्या पत्रकाराने शाई फेकीचा व्हिडिओ शुट केला त्या पत्रकाराला देखील अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे, आणि पत्रकार देखील या कटाचा एक भाग असल्याचे सांगून अजून काही पत्रकारांना अटक करण्यात येणार असल्याचे समजते हा तर आता लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा हल्ला आहे, या सर्व प्रकारातून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल ही स्पष्ट दिसुन येते, एकंदरीत आम्ही कोणाला काही बोलु, महापुरुषांचा अपमान करत राहु, मनाला वाटेल तसे वागु आणि असे करत असताना आम्हाला कोणी विरोध केला तर त्याला हुकुमशाही हिटलरशाहीला प्रमाणे शिक्षा करु अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची दिसून येते,
,,. . प्रदिप गोविंद रोकडे. _ अध्यक्ष_ लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य