इंडिया आघाडीला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतील तर बाबासाहेबांचा फोटो आणी नीळा झेंडा वापरू नका. डॉ. राजन माकणीकर

*मुंबई दि (प्रतिनिधी) इंडिया आघाडीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रधेय बाळासाहेब आंबेडकर चालत नसतील तर डॉ. बाबासाहेबांचा फोटो वापरून राजकारण करू नका असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.*
इंडिया आघाडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतील तर माझ्या सारख्या सच्चा आंबेडकरी अनुयाई तसेच बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या मतदारांना इंडिया आघाडी अजिबात चालणार नाही. असा इशाराच विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.
बहुजन हृदयासम्राट बाळासाहेब आंबेडकरांना डावलून जर
इंडिया आघाडी पूर्ण होत असेल, मात्र केवळ भावनिक राजकारणा पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व नीला ध्वज वापरत तर आम्ही आंबेडकर विचारी मतदार तुमचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही याची नोंद घ्यावी. असा सणसणीत इशाराही डॉ. माकणीकर यांनी दिला
अश्या अश्यायचे इमेल सर्व इंडिया आघाडीतील पक्ष प्रमुखांनां पाठवले जाणार असून अश्या विकृतीचा जाहीर निषेध पॅन्थर माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.