मनोरंजन !! महादेव बेटिंग ॲपमुळे साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या सविस्तर माहिती
प्रतिनिधि:- प्राची जाधव

2019 साली निर्मित झालेल्या महादेव बुक ऑनलाईन हा बेटिंग ॲप पुन्हा एकदा चर्चेत आल्याचा पाहायला मिळतोय. या बेटिंग अँप वरून अनेक प्रकारची अनधिकृत कामे सुरू असतात. अशातच राजकारण्यांसह सिनेसृष्टीतील कलाकार देखील या बेटिंग ॲप पासून वंचित नाहीत. अनेक कलाकारांची नावे या बेटिंग अँप मार्फत समोर आली असून, अभिनेता साहिल खान हा देखिल महादेव बेटिंग अँपच्या विळोख्यात सापडला होता. परंतु आता साहिलच्या आयुष्यात याच महादेव बेटिंग ॲपने मोठं संकट आणलं आहे.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांच्या एसआयटीने बेड्या ठोकल्या आहेत. महादेव बेटिंग ॲपचा भाग असलेल्या, ‘खान द लायन बुक’ नावाच्या एका बेटिंग ॲपशी साहिल जोडला गेला होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी याआधीही केली होती. त्यावेळी साहिल खानने जामीनासाठी कोर्टात धाव घेतली. परंतु त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
अभिनेता साहिल खान याला आता छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तिथून त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. साहिल खानने महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग असलेल्या Louts Book 24/7 या ॲपचं लॉन्चिंग केलं आहे. साहिल सेलिब्रेटींना बोलवायचा आणि मोठमोठ्या पार्ट्या करायचा. या प्रकरणाचं पुढे नेमकं काय होणार आहे याची उत्सुकता नेटकऱ्यायांना लागली आहे. सोबतच साहिल खानने आतापर्यंत स्टाईल, एक्सक्यूज मी, अलादीन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि पुढे या सगळ्या प्रकरणाचा साहिलच्या करिअरवर काय परिणाम होईल याची देखील उत्सुकता साहिलच्या चाहत्यांना लागली आहे.