ओबीसी समाजाला अद्याप कुठल्याही प्रकारच आरक्षण मिळालेल नसल्याच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड,प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे,प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओ क्लिप द्वारे सदरची माहिती दिली आहे
, ओबीसी समाजाच्या आरक्षणा बाबत प्रकाश आंबेडकर यांच्या व्हिडिओ क्लिप मुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, महाराष्ट्र राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी २७ टक्के आरक्षण मंजूर केल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मिळाले असल्याचा गैरसमज पसरवला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे, मागील काळात जाहीर झालेल्या निवडणुका ह्या पावसाळा असल्याने पुढे ढकलल्या असुन आता पुन्हा जाहीर होणाऱ्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणा शिवाय घेण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्या मुळे आरक्षण मिळाले म्हणून ज्यांनी पेढे वाटले आणि ओबीसी आरक्षणा बाबत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांनी आता ओबीसींना आरक्षण या निवडणुकीत नाही तर पुढच्या निवडणुकीत तरी असेल का? याचा खुलासा करावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे, त्या मुळे ओबीसी समाजाची फसवणूक होत असुन या फसव्या राजकारण्यां पासून आपण वाचा आणि वंचित बहुजन आघाडी सोबत भक्कमपणे उभे राहा असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला केले आहे,