महाराष्ट्र
नाशिकमध्ये संघर्ष महिला बचत गटाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ व्या जयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला…*

नाशिक प्रतिनिधी (बाळासाहेब साळवे) : आनंदवल्ली, नाशिक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संघर्ष महिला बचत गटाच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला फुल हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माहेरचा कट्टा या ग्रुप कडून अभिनेत्री स्मिता पाटील तर ऑन धिस टाईम मीडियाची वतीने दिनेशभाऊ जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. सोबत बचत गटाचे अध्यक्ष रेखा साळवे, उपाध्यक्ष वंदना बिराडे, सचिव भारती साळवे ,शितल साळवे, कविता साळवे,दीक्षा वाघ, सीमा साळवे ,रेखा साळवे ,शितल साळवे .यांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरा करण्यात आली व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.