गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्रंबकेश्वरमधील डहाळेवाडी गावातील बालकांनी एकत्रित येवून केली अंतरंग बालसंसद ची स्थापना”
नाशिक! शांताराम दुनबळे

नाशिक-: लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया, चिल्ड्रेन युनाईट फॉर एक्शन, नाशिक च्या माध्यमातून त्रंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी गावात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांनी एकत्र येवून अंतरंग बालसंसद, डहाळेवाडी ची स्थापना केली व मंत्रिमंडळ शपथविधी समारोह पार पाडला. बालसंसद स्थापनेसाठी गावातील समविचारी मुले एकत्र आली त्यांनी गावातील बालकांच्या व गावातील समस्यांचा अभ्यास केला तसेच मुलांमध्ये नेतृत्वगुण विकीसित होण्याच्या दृष्टीने त्यांनी मंत्रिमंडळ ची स्थापना केली त्यासाठी मतदान प्रक्रिया पार पाडली व मंत्रिमंडळ स्थापन केले. गावातील बालविवाह, बालमजुरी शाळाबाह्य मुलांची समस्या, आरोग्य व पर्यावरण समस्या ई. विषयवार बालसंसदेमार्फत आवाज उठवून मोठ्याच्या मदतीने व गावातील विविध संस्थाच्या माध्यमातून त्यावर उपाययोजना बालके करणार आहेत.
बाल संसद स्थापना व शपथविधी समारोह कार्यक्रमाचे संचलन राकेश कांबळे यांनी केले. तसेच अंतरंग बालसंसद प्रधानमंत्री, गायत्री खाडे, गावाचे उपसरपंच ईश्वर भांडकोळी, आय टी आय प्रशिक्षक सुधाकर राजगुरू, आशा कार्यकर्ता सीता लामटे व स्वप्निल पगारे यांच्या उपस्थितीत अंतरंग बालसंसद फलकाचे अनावरण होऊन शपथविधी समारोह पार पडला. कार्यक्रमात गावाचे माजी उपसरपंच प्रकाश खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पूजा खैरनार व संगिता बावणे समुदाय विकास संघटक, कुफा प्रोजेक्ट नाशिक यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वय साधला. या कार्यक्रमासाठी परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.