सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय व्हावे म्हणून जिल्ह्यातील दिव्यांगांची स्वाक्षरी मोहीम आंदोलन….

प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव रामदासजी खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना अपंग हृदय सम्राट आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय व्हावे याकरिता जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी स्वाक्षरी केलेली फाईल स्वपुर्त केली.तसेच जिल्ह्यातील दिव्यांगांना होणाऱ्या शासन दरबारी समक्षाबाबत निवेदन देण्यात आले
.दरम्यान निवेदनात प्रमुख मागण्यामध्ये दिव्यांचेच स्वतंत्र मंत्रालय व्हावे,दिव्यांगांना हक्काचे दिव्यांग भवन सांगलीमध्ये व्हावे,1995 घ्या कायद्याची व 2016 घ्या कायद्याची अंमलबजावणी त्वरीत करावी, संजय गांधी निराधार दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये तहसीलदारांचा त्यांना दाखले ऐवजी तलाठ्यांचा ग्राह्य धरण्यात यावा व व उत्पन्नाची अट 50000 ऐवजी एक लाखापर्यंत करावी तसेच दिव्यांगांची पेन्शन दर महिन्याला जमा झालीच पाहिजे, रेशन सर्वे मध्ये दिव्यांगांना कुटुंब प्रमुखाचे अट न लावता त्यांना अंतोदय योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे, पद्मभूषण वसंत दादा शासकीय रुग्णालयामधून देण्यात येणाऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राचे ऑनलाइन यू.डी.आयडी दिव्यांग प्रमाणपत्र हे सहा-सात महिने दिले जात नाही त्यासाठी दिव्यांगांचे विनाकारण हेळसांड होत आहे ती त्वरित थांबवून एकाच दिवशी दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे,दिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसन्स करिता फिटनेस प्रमाणपत्र हे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधूनच देण्यात यावेत,दिव्यांगांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून बिजभांडवल दिड लाख योजने ऐवजी पाच लाख करावी,दिव्यांग-अव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये दिव्यांग-दिव्यांग विवाहाचाही सामाविष्ट करून योजनेचा लाभ द्यावा,दिव्यांगांना शिक्षणामध्ये मुलभूत सुविधा व फी माफ करावी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद,ग्रामपंचायत परिसरामध्ये दिव्यांगांना त्यांच्या उदरनिर्वाह करिता दुकान गाळे व्यवसायाकरिता कोणतीही अट न लावता त्वरीत उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या प्रहार अपंग संघटना महाराष्ट्र राज्याचे महासचिव रामदास खोत, जिल्हाध्यक्ष रामदास कोळी,जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर, जिल्हा सचिव सुरेश गायकवाड, जिल्हा महिलाध्यक्षा स्वाती भस्मे, जिल्हा शहराध्यक्ष जग्गू शेख, जिल्हा समन्वयक नागराज चांदकोटी,दिलीप जाधव, वाळवा तालुका अध्यक्ष प्रदिप माने पदाधिकारी, कडेगांव तालुका अध्यक्ष प्रमोद कुंभार पदाधिकारी,पलूस तालुका अध्यक्ष संजय चौगुले पदाधिकारी, सांगली शहराध्यक्ष हरिष पुजारी पदाधिकारी, पलूस तालुका सचिव लखन माळी पदाधिकारी, कवठेमहांकाळ तालुका महिला अध्यक्षा जरिणा मणेर पदाधिकारी, तासगाव तालुका समन्वयक विनोद पाटिल पदाधिकारी, शिराळा,वाळवा,कडेगाव, पलूस,मिरज, तासगाव,विटा खानापूर, आटपाडी,जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.