आज शहिद क्रांतिवीर, भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.!
जिल्हा परिषद शाळा-ढोके दापिवली,केंद्र-मुळगांव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे*

भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये फार मोलाचे आणि प्रचंड असे योगदान देणारे सशस्त्र क्रांतीचे लढाऊ नेतृत्व म्हणजे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. आज स्मृतीदिनानिमित्त फक्त एवढ्याच गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न करतो.
स्वातंत्र्यापूर्वी तीस वर्षापूर्वी भगतसिंग यांनी प्रखरपणे आपले मत मांडले होते व विधान केलं होतं की *भारत देशातून गोरे सरकार निघून जाईल.जे भारताला लुटत होतं आणि राजकारण्यांच्या स्वरूपात जनतेला आणि देशाला लुटणारे काळे सरकार सत्तेवर येईल.* यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा पर्याय अवलंबला आहे .
अर्थात आज या सत्य विधानाला शंभर वर्ष झाली असावीत.आणि आता भारतावरती कुटुंबाच्या विकासासाठी साम्राज्यवादी नेतृत्व, सहकार सम्राट,साखरसम्राट, शिक्षणसम्राट,मद्यसम्राट, व्यापारलॉबी,कॉन्ट्रॅक्टरलॉबी यासारख्या भ्रष्ट राजकारण्यांची आणि भ्रष्ट लोकांची सत्ता आलेली आपणांस दिसून येते.
*भारताच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी हुतात्मा पत्करणार्या भगतसिंग,राजगुरु आणि सुखदेव या हुतात्म्यांना आणि विचारवंतांना आमचे कोटी कोटी प्रणाम!*