ताज्या घडामोडी

बदलापूर !! कॉंग्रेस पक्षाचा विरोध विज प्रकल्पाला नाही तर बगिचा आणि क्रीडांगण साठी आरक्षित असलेली जागा देण्यासाठी आहे – प्रदिप गोविंद रोकडे

बगिचा साठी आरक्षित जागा विज प्रकल्पाला देण्यासाठी आमचा विरोध कायमच राहिल

सध्या बदलापुर शहरामध्ये वारंवार खंडित होत असलेल्या विजपुरवठ्या वरुन टाटा पॉवर कंपनीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे, शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन बदलापूर शहरामध्ये नवीन विज प्रकल्प सुरू करण्यासाठी बदलापुर पुर्व परिसरातील बगिचा आणि क्रीडांगण साठी आरक्षित असलेली जागा टाटा पॉवर कंपनीला देण्याचा घाट स्थानिक आमदार आणि पालिका प्रशासनाने घातला आहे,

या साठी कॉंग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाने बगिचा आणि क्रीडांगण साठी आरक्षित असलेली जागा अशा प्रकारे कोणत्याही प्रकल्पाला देण्यास विरोध दर्शविला आहे,

झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील नैसर्गिक वातावरणात समतोल राखण्यासाठी बगीचाचे आरक्षण टाकले जाते, या साठी बगिच्याच्या जागेवर विज प्रकल्पासाठी विरोध केला असल्याचे कॉंग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदिप रोकडे यांनी सांगितले आहे,

केंद्रीय मंत्री कपिल यांनी देखील ही जागा टाटा पॉवर कंपनीला देण्यास विरोध केला आहे, शहरामध्ये नवीन विज प्रकल्प सुरू करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने कधीच विरोध केलेला नसून फक्त बगिचा आणि क्रीडांगण साठी आरक्षित असलेली जागा कोणत्याही प्रकल्पाला देण्यास मात्र कॉंग्रेस पक्षाने विरोध केला असल्याचे ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी म्हटले आहे, टाटा कंपनीने खाजगी जागा विकत घेऊन प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणाचीही हरकत नसल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी देखील सांगितले आहे, परंतु काही अतीऊत्साही पत्रकार चुकीच्या बातम्या छापून विज प्रकल्पाला विरोध केला असल्याच्या खोट्या बातम्या देऊन समाजात गैरसमज पसरवत असल्याने अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रदीप रोकडे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.